६० मुलांचा एकच बाप! सर्व मुलं सारखीच दिसतात; पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:47 AM2023-02-21T11:47:30+5:302023-02-21T11:48:27+5:30
स्पर्म दात्याने अनेक सदस्यांना स्पर्म दान केले होते. नियमानुसार एकावेळी फक्त एका दात्याचे स्पर्म वापरावे असा नियम आहे.
जगभरात मुलं न होण्याच्या अनेकांना समस्या आहेत. यावर आता आयव्हीएफ तंत्रज्ञान हा एक पर्याय आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मुलं जन्माला घालू शकतात. पण, ऑस्ट्रेलियामध्ये यासंदर्भात एक मोठा गोंधळ समोर आला आहे. ६० मुलं एकसारखीच दिसत असल्याचे प्रकरण समोर आले. हा प्रकार समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
स्पर्म दात्याने अनेक सदस्यांना स्पर्म दान केले होते. नियमानुसार एकावेळी फक्त एका दात्याचे स्पर्म वापरावे असा नियम आहे. पण, त्याने चार वेगवेगळी नावे देऊन अनेक पालकांना स्पर्म दान केले. मुले जन्माला येईपर्यंत सगळे सुरळीत होतं, ज्यावेळी या सर्व मुलांची गेट-टुगेदर पार्टी आयोजित केली होती, यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. या सर्व मुलांचे एकमेकांचे कोणतेही नाते नव्हते तरीही ही सर्व मुलं एकसारखीच दिसत असल्याचे आढळून आले. यानंतर या प्रकाराचे कारण समोर आले, हे कारण ऐकून सर्वांना धक्का बसला. सत्य समोर आल्यानंतर सर्व पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.