बापरे! टॉयलेटला गेलेला युवक, अचानक साप वर आला; त्यानंतर 'असं' काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 03:57 PM2024-08-18T15:57:21+5:302024-08-18T15:59:08+5:30

पावसामुळे अनेकदा बिळात पाणी भरल्याने साप सुरक्षित स्थळ शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यात ते घरांतही शिरतात

A snake was found in a house in Arihant Colony in Gandhinagar, Madhya Pradesh | बापरे! टॉयलेटला गेलेला युवक, अचानक साप वर आला; त्यानंतर 'असं' काय घडलं...

बापरे! टॉयलेटला गेलेला युवक, अचानक साप वर आला; त्यानंतर 'असं' काय घडलं...

मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण कुटुंब दहशतीत आलं आहे. याठिकाणच्या गांधीनगर येथील अरिहंत कॉलनीतील एका घरात साप आढळला. त्यात रविवारी कुटुंबातील एक सदस्य टॉयलेटसाठी गेला असताना टॉयलेटच्या सीटमधून साप बाहेर पाहू लागला. सापाला अचानक पाहून व्यक्ती प्रचंड घाबरला आणि दरवाजा उघडून बाहेर पडला. त्यानंतर रेस्क्यू टीमनं या सापाला पकडलं. मात्र या घटनेनं कुटुंबाला धक्का बसला आहे.

माहितीनुसार, पीडित कुटुंबाचे घर शेतात बनलेले आहे. शेतात पाणी भरल्याने साप घरात शिरतात. गेल्या काही दिवसांत घरातून २ साप बाहेर काढण्यात आले आहेत. आता त्यांच्या घरातील टॉयलेटमध्ये साप आढळला. आज सकाळी घरातील एक जण टॉयलेटसाठी आत गेला होता तेव्हा त्याची नजर टॉयलेट सीटवर पडली. त्यावेळी आतून १ कोब्रा जातीचा साप बाहेर पाहत होता. सापाला पाहताच त्याची बोबडी वळाली तो तिथून बाहेर पडला आणि घरातील इतर सदस्यांना हा प्रकार सांगितला.

रेस्क्यू टीमनं सापाला पकडलं

घरातील सदस्यांनी तातडीने याबाबत रेस्क्यू टीमला कळवलं. त्यानंतर रेस्क्यू टीम घरी पोहचली आणि त्यांनी या सापाला पकडून प्राणी संग्रहालयात सोडले. मात्र घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबावर भीतीचं सावट आहे. पीडित कुटुंबाचं घर शेतात बनल्यामुळे त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते. सध्या पावसाचे दिवस आहेत अशावेळी शेतात पाणी भरते. त्यामुळे पाण्यापासून वाचण्यासाठी साप सुरक्षित जागा शोधतो. त्यात हे साप घरात शिरतात. आसपासच्या अन्य घरातूनही साप आढळले आहेत असं वन अधिकाऱ्यांनी म्हटलं.

दरम्यान, पावसामुळे साप आणि अन्य किटके बाहेर पडतात. पावसामुळे शेतातील बिळात पाणी भरते, त्यामुळे त्यातील किटके सुरक्षित आणि उंच ठिकाणी पळून जातात. त्यावेळी शेतात बनलेल्या घराचा आधार त्यांना सुरक्षित वाटतो त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: A snake was found in a house in Arihant Colony in Gandhinagar, Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप