भविष्यातील माहामारीचा टाईम ट्रॅव्हलरने केला दावा, २०२४ साली जगात नव्या व्हायरसचे थैमान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 06:16 PM2022-07-03T18:16:03+5:302022-07-03T18:19:33+5:30

2024 साली आणखी एक व्हायरस जगभर थैमान घालणार आहे (Virus in 2024 Year), असा भयावह दावा एका टाइम ट्रॅव्हलरने केला आहे. या व्हायरसशी लढण्यासाठी तयार राहा, अशी सूचना या टाइम ट्रॅव्हरने दिली आहे (Time Traveller Weird Claim).

A 'Time Traveller From 2096' Says Mysterious & Dangerous Virus Will Take Over The World, Again! in 2024 | भविष्यातील माहामारीचा टाईम ट्रॅव्हलरने केला दावा, २०२४ साली जगात नव्या व्हायरसचे थैमान

भविष्यातील माहामारीचा टाईम ट्रॅव्हलरने केला दावा, २०२४ साली जगात नव्या व्हायरसचे थैमान

googlenewsNext

जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहेत (Coronavirus cases). त्यात मंकीपॉक्स (Monkeypox virus) व्हायरसनेही शिरकाव केलेला आहे. हे संकट कधी टळणार याची प्रतीक्षा असताना आता आणखी एका संकटाचा इशारा देण्यात आला आहे. 2024 साली आणखी एक व्हायरस जगभर थैमान घालणार आहे (Virus in 2024 Year), असा भयावह दावा एका टाइम ट्रॅव्हलरने केला आहे. या व्हायरसशी लढण्यासाठी तयार राहा, अशी सूचना या टाइम ट्रॅव्हरने दिली आहे (Time Traveller Weird Claim).

काही लोक आपण भविष्यात जाऊन आल्याचा दावा करतात, त्यांना टाइम ट्रॅव्हल म्हटलं जातं. स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या अशाच एका व्यक्तीने 2024 बाबत भविष्यवाणी केली आहे. @timetravlehqr या आपल्या टिकटॉक अकाऊंटवर त्याने पोस्ट केली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या व्यक्तीने 28 जूनला ही पोस्ट केली आहे. ज्यात म्हटलं आहे, 'सावधान! काही लोकांना माझ्यावर विश्वास नसेल पण मी एक टाइम ट्रॅव्हलर आहे, आता मी 2096 साला आहे. काही घटना आहेत, ज्या धरतीवर घडणार आहेत'

त्याने दिलेल्या माहितीनुसार 2022 सालात अमेरिका यूएफओशी संबंधित दस्तावेज जगासोबत शेअर करेल. 2023 साली धरतीच्या खाली सर्वात मोठा जिवंत जीव सापडेल. 2024 साली आणखी एक खतरनाक आणि रहस्यमयी व्हायरल तिसऱ्या जगातील देशात निर्माण होऊ संपूर्ण जगात पसरेल. यासाठी तयार राहण्याचा सल्ला या व्यक्तीने दिला आहे.

व्यक्तीच्या या भयावह दाव्यानंतर यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी हा दावा खरा असल्याचा मानण्यास नकार दिला आहे. एका युझरने हा दावा खोटा असल्याचं म्हणत यूएफओचे दस्तावेज आधीच समोर आल्याचं सांगितलं आहे. यात युएफओ दस्तावेजशी संबंधित गोष्टच खरी आहे, याच आधारे हा व्हिडीओ बनवला असेल, असं काही जणांचं म्हणणं आहे.

टाइम ट्रॅव्हरच्या या दाव्याचं समर्थन न्यूज 18 लोकमत करत नाही. त्यात किती तथ्यता आहे हे माहिती नाही. पण तुम्हाला या दाव्याबाबत नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

Web Title: A 'Time Traveller From 2096' Says Mysterious & Dangerous Virus Will Take Over The World, Again! in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.