झाडं लावण्यासाठी खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:07 PM2022-09-27T12:07:15+5:302022-09-27T12:07:46+5:30
Jara Hatke: झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे.
गाझा - अनेकदा लोकांना अचानकपणे असा काही खजिना मिळतो, ज्याबाबत आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. हा खजिना अशा लोकांचं नशिबच बदलून टाकतो. काही लोकांना अचानकपणे खजिना सापडल्याच्या बातम्या येत असतात. असाच काहीसा प्रकार एका शेतकऱ्यासोबत घडला आहे. झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे. त्यामुळे या घटनेची चर्चा होत आहे.
रिपोर्टनुसार ही घटाना गाझामधील आहे. येथे एक पॅलेस्टाइनी शेतकरी काही महिन्यांपूर्वी झाड लावण्यासाठी खोदकाम करत होता. खोदकाम सुरू असताना त्याची कुदळ एका टणक वस्तूवर आदळली. त्याने कुतुहलाने मनलाला बोलावून तिथे दोन तीन महिने सातत्याने खोदकाम केले. तीन महिन्यांनंतर तिथे बीजान्टिक काळातील एक कलाकृती सापडली. ही कलाकृती सुस्थितीत होती. या शोधामुळे पुरातत्व विभागाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पुरातत्त्ववेत्ते रेने एल्टर यांनी सांगितले की, ही कलाकृती ५व्या ते ७व्या शतकादरम्यानची असावी. हे बांधकाम कधी तयार करण्यात आले, यााबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. त्यासाठी त्या ठिकाणी अधिक अचूकपणे खोदकाम करावे लागेल. प्राचीन काळात गाझापट्टी, मिस्त्र आणि लेव्हंट यांच्यात व्यापाराचा महत्त्वपूर्ण मार्ग होता. हा भाग ताम्रयुगापासून इस्लामिक आणि ऑटोमन काळापर्यंतच्या संस्कृतींच्या अवशेषांनी भरलेला आहे.
गाझाच्या ज्या भागत ही कलाकृती सापडली आहे, तिथे नेहमी इस्राइल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्घ होत असतो. अशा परिस्थितीत या खजिन्याचं संरक्षण कसं करावं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जागा इस्राइलच्या सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर आहे. सध्या हा खजिना पत्र्याने झाकून ठेवण्यात आला आहे. खजिन्याचा शोध घेऊन त्याचं संरक्षण केल्याने सरकारकडून बक्षीस मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.