च्युइंगम चघळून चघळून महिला बनली लखपती, कमाई वाचून व्हाल तुम्ही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 10:34 AM2023-03-09T10:34:27+5:302023-03-09T10:35:05+5:30

जुलियाने हे काम टाइम पास म्हणून सुरू केलं होतं. पण आता इतकी कमाई होते की, हे काम ती फुल टाइम करू लागली आहे. जुलिया एकाचवेळी 30 च्युइंगम तोंडात टाकते.

A woman became a millionaire by chewing gum you will be surprised | च्युइंगम चघळून चघळून महिला बनली लखपती, कमाई वाचून व्हाल तुम्ही अवाक्

च्युइंगम चघळून चघळून महिला बनली लखपती, कमाई वाचून व्हाल तुम्ही अवाक्

googlenewsNext

कधी, कुठे आणि कुणाचं नशीब कसं चमकेल हे कुणीही सांगू शकत नाही. काही लोक पैसे कमावण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात तेव्हा कुठे त्यांना काही हजार रूपये मिळतात. काही लोकांना तर तेही मिळत नाही. पण काहींना इतकं भरभरून मिळतं की, थक्क व्हायला होतं. अशीच एक महिला आहे. जिला धावपळ न करता, फार मेहनत न करता लाखो रूपये मिळतात. तिच्या कमाई माध्यम वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

ही महिला केवळ च्युइंगम चघळून महिन्याला 67 हजार रूपये कमाई करते. तिने कमी मेहनतीने लाखो कमावण्याचा फंडा शिकून घेतलाय. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, जुलिया केवळ च्युइंगम चघळून महिन्याला 67 हजार रूपये कमावते. पार्ट टाइम सुरू केलेलं हे काम आता तिने फुल टाइम सुरू केलं आहे.

जुलियाने हे काम टाइम पास म्हणून सुरू केलं होतं. पण आता इतकी कमाई होते की, हे काम ती फुल टाइम करू लागली आहे. जुलिया एकाचवेळी 30 च्युइंगम तोंडात टाकते आणि त्यापासून एक मोठा फुगा फुगवते. बस तिच्या याच कामाचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहेत. व्हिडिओच्या लाखो व्ह्यूजच्या माध्यमातून ती महिन्याला 67 हजार रूपये कमाई करते. हे करण्यासाठी तिला केवळ 480 रूपये खर्च करावे लागतात आणि या पैशातून ती च्युइंगम खरेदी करून लाखो रूपये कमावत आहे.

जुलियाला ही आयडिया कुठून आणि कधी आली याबाबत तिने सांगितलं की, एकदा तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं की, आपण च्युइंगम खाण्याचा व्हिडीओ बनवायचा का? आणि हा व्हिडीओ इंटरनेट विकायचा. जुलियाला ही आयडिया आवडली आणि गमती गमतीत सुरू केलेलं हे काम तिला मोठी कमाई करून देत आहे. आधी ती तिचे फोटो शेअर करत होती आता ती तिचे व्हिडीओ शेअर करते आणि लाखोंची कमाई करते.

Web Title: A woman became a millionaire by chewing gum you will be surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.