जबरदस्त! 'या' नोकरीतून महिला कमावते दिवसाला १ लाख; पगारासह अनेक लग्झरी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:38 AM2023-06-01T09:38:36+5:302023-06-01T09:39:02+5:30

ग्लोरिया रिचर्डला हे काम करण्यासाठी १ तासाला जवळपास १६७ डॉलर म्हणजे १३.८ हजार रुपये मिळतात.

A woman earns 1 lakh per day from 'this' job; Many luxury facilities with salary | जबरदस्त! 'या' नोकरीतून महिला कमावते दिवसाला १ लाख; पगारासह अनेक लग्झरी सुविधा

जबरदस्त! 'या' नोकरीतून महिला कमावते दिवसाला १ लाख; पगारासह अनेक लग्झरी सुविधा

googlenewsNext

अनेकजण नोकरीच्या शोधात फिरत असतात पण कधी मनासारखी नोकरी मिळत नाही तर कधी पगारही पुरेसा नसतो. पण एक ३४ वर्षीय महिला असं काम करते ज्यामुळे ती महिन्याला लाखो रुपये कमावते. न्यूयॉर्कमधील ग्लोरिया रिचर्ड असं या महिलेचे नाव आहे. जी दिवसाला १ लाख रुपये कमाई करते. श्रीमंतांच्या मुलांची देखभाल करणे हे तिचे काम आहे. 

ग्लोरिया रिचर्डला हे काम करण्यासाठी १ तासाला जवळपास १६७ डॉलर म्हणजे १३.८ हजार रुपये मिळतात. महिन्याचा हिशोब लावला तर २ हजार डॉलर म्हणजे तब्बल १.६० लाख रुपये झाले. CNBC रिपोर्टनुसार, ग्लोरियाला पगारासोबतच उत्तम दर्जाच्या सुविधा दिल्या जातात. प्रायव्हेट जेटमधून प्रवासासह लग्झरी ट्रीप करण्याची संधी मिळते. या नोकरीत त्या सर्व गोष्टी आहेत ज्याने तिचे आयुष्य स्वप्नातील दुनियेसारखे झाले आहे. 

वर्षातून २ महिनेच ती हे काम करते बाकी १० महिने आरामात जगते. या लहान मुलांसोबत राहणे तिला खूप आवडते. परंतु हे काम सोपे नाही तर आव्हानात्मक आहे. ग्लोरिया न्यूरो डाइवर्जेंट मुलांचा सांभाळ करते जी मुलांची शिकण्याची क्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या महिलांच्या तुलनेने कठीण आहे. 

ग्लोरिया सांगते की, मी याकामासाठी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या जिथे आईवडील म्हणतात शाळेतून आल्यानंतर मुलांचा सांभाळ करायचा. अनेक कुटुंबाला स्वत:च्या मुलांनाही भेटायला वेळ नसतो. ग्लोरिया दिवसातून १० ठिकाणी काम करते. त्यामुळे तिच्या दिवसाची कमाई लाख रुपयांपर्यंत सहज जाते.

Web Title: A woman earns 1 lakh per day from 'this' job; Many luxury facilities with salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.