बॉयफ्रेंड शोधण्यासाठी तरुणीचा खास जुगाड, क्यूट तरुणांना गुपचूप देते एक कार्ड अन् मग...!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:39 PM2023-10-21T18:39:18+5:302023-10-21T18:44:14+5:30
...यामुळेच एका तरुणीने आपला साथीदार शोधण्यासाठी एक खास जुगाड अथवा ट्रिक शोधून काढली आहे.
सोशल मीडियामुळे डेटिंग पार्टनर अथवा लाइफ पार्टनर शोधणे बरेच सोपे झाले आहे. मात्र डेटिंग अॅप्सवर फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतात. यामुळेच एका तरुणीने आपला साथीदार शोधण्यासाठी एक खास जुगाड अथवा ट्रिक शोधून काढली आहे.
डेटिंग कार्डचा करते वापर -
डेली मेलच्या वृत्तानुसार, सिंगलपणाला कंटाळलेल्या सोफी नावाच्या एका 30 वर्षीय तरुणीने स्वत:साठी बरेच डेटिंग कार्ड तयार करून घेतले आहेत. जसे व्हिजिटिंग कार्ड, बिझनेस कार्ड असते, अगदी त्याच पद्धतीचे डेटिंग कार्ड. यामुळे आपल्याला किमान नकार मिळणार नाही आणि कदाचित कुणी संपर्क तरी साधेल, अशी आशा तिला होती. हे डेटिंग अॅपपेक्षा चांगलेच असेल. सोफीने सांगितले की, ऑफिसमध्ये जाताना आणि येताना रास्त्यात अथवा ट्रेनमध्ये कुणी चांगले वाटलेच, तर मला केवळ त्याला हे कार्ड देण्याची हिम्मत करायची होती.
'डेटिंग अॅपला कंटाळले...' -
या कार्डवर सोफीने एक सिंपल मॅसेज लिहिला होता. "हाय.. मला वाटते की, आपण खूप सुंदर आहात. माझे नाव सोफी आहे. मला डेटिंग अॅप्सचा कंटाळा आला आहे. जर आपल्यालाही मी सुंदर वाटली असेल, तर कृपया संपर्क साधा." याच बरोबर सोफीने कार्डवर आपला इंस्टाग्राम आणि इमेल आयडीही लिहिला होता. सोफी म्हणते, मी गेल्या 29 वर्षांत कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत संपर्क साधला नाही. मात्र हे डेटिंग कार्ड यूज करणे फारसे अवघड वाटत नाही.
कामी आली आयडिया -
सोफीने सांगितले की, तिने बऱ्याच ठिकाणी तरुणांना हे कार्ड दिले आहेत. यासाठी हिंमत तर लागतेच, पण लोकही तिचा गांभीर्याने विचार तर करतात. तिला लोकांचे मेसेजही येतात. एका व्यक्तीने लिहे की, ही आयडिया फारच आवडली. पण मी सिंगल नाही. आशा आहे की, आपल्याला कुणी चांगला मुलगा भेटेल. सोफीला आशा आहे की, तिला लवकरच कुणी मिस्टर परफेक्ट नक्की मिळेल.