'ती' बॉयफ्रेन्डने दिलेल्या दग्यामुळे संतापली, ७३ पुरूषांसोबत केलं असं काही पोलिसांनी उचलून नेलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:55 PM2024-09-04T14:55:35+5:302024-09-04T14:57:01+5:30
या व्यक्तीने दावा केला होता की, एमी नावाच्या एका ट्रान्सजेंडर महिलेने त्याच्याकडून १५ मिलियन baht म्हणजे ३.७ कोटी रूपये लुटले.
प्रेमात दगा मिळणारे लोक अनेकदा फार घातक होतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत की, प्रेमात दगा मिळाल्यानंतर लोकांनी दुसऱ्यांचं नुकसान केलं किंवा सूड घेतला. अशीच एक घटना थायलॅंडमधून समोर आली आहे. Uthai Nantakhan नावाच्या ट्रान्सवुमनला एकूण ७३ जपानी लोकांची फसवणूक करण्यासाठी अटक करण्यात आली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, थायलॅंडमध्ये एका जपानी व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. या व्यक्तीने दावा केला होता की, एमी नावाच्या एका ट्रान्सजेंडर महिलेने त्याच्याकडून १५ मिलियन baht म्हणजे ३.७ कोटी रूपये लुटले. एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने दावा केला की, एमीसोबत त्याची भेट थायलॅंडमध्ये झाली होती. तेव्हा तिने सांगितलं होतं की, ती हॉंगकॉंगची टूरिस्ट आहे आणि तिची पासपोर्ट व बॅग हरवली आहे.
पैसे आणि सोनं घेऊन पळाली...
या व्यक्तीने असंही सांगितलं की, एमीने एका हॉटेलचं बिल भरण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. या व्यक्तीने दावा केला की, डेटिंग सुरू झाल्यावर मी तिला इन्शुरन्स आणि मेडिकल खर्चासाठी काही पैसे उधार दिले. जे तिने कधीच परत केले नाहीत. कथितपणे तिने या व्यक्तीकडून सोनंही विकत घेतलं होतं. आता समोर आलं आहे की, एमीने अशा अनेक जपानी लोकांची फसवणूक केली आहे.
चौकशी दरम्यान पोलिसांना समजलं की, एमीने ज्या लोकांची फसवणूक केली ते सगळे जपानी लोक होते. चौकशी दरम्यान एमीने दावा केला की, तिचा एक जपानी बॉयफ्रेन्ड होता. त्याने मला दगा दिला होता. ती म्हणाली की, 'त्याशिवाय माझा बॉयफ्रेन्ड राहिलेल्या आणखी एका जपानी तरूणाने मला दगा दिला होता आणि माझे पैसे लुटले होते. त्यामुळे मी जपानी लोकांचा राग करते. मला जपानी लोकांचा सूड घ्यायचा आहे'.
पोलिसांच्या रिपोर्टनुसार, एमीने २०११ ते २०२४ दरम्यान एकूण ७३ जपानी पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. या सगळ्यांकडून तिने जवळपास ७.५ कोटी रूपये लुटले होते. आता तिला ३ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.