अरे बापरे! तरुणीला आहे 'हा' अजब आजार; घाम, अश्रूंपासून मोठा धोका, पाण्याच्या थेंबाने जळते त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 08:32 AM2022-03-01T08:32:14+5:302022-03-01T08:37:20+5:30

Abbie Plummer : पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला हा विचित्र आजार असल्याने स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे. 

abbie plummer of uk have rare skin problem skin burns sweat water aquagenic urticaria | अरे बापरे! तरुणीला आहे 'हा' अजब आजार; घाम, अश्रूंपासून मोठा धोका, पाण्याच्या थेंबाने जळते त्वचा

अरे बापरे! तरुणीला आहे 'हा' अजब आजार; घाम, अश्रूंपासून मोठा धोका, पाण्याच्या थेंबाने जळते त्वचा

Next

पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. पण तुम्हाला जर कोणी पाण्याचा एक थेंब हा शरीरासाठी घातक असल्याचं सांगितलं. तर तुमचा सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एक तरुणी अशाच एक भयंकर आजाराने त्रस्त आहे. स्वतःचा घाम, अश्रू, अंघोळ या गोष्टी तिच्यासाठी जीवघेण्या ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. तरुणीला पाण्यामुळे इतका त्रास होते की पाण्याचा थेंब जरी तिच्या शरीरावर पडला तरी तिची त्वचा जळते. तिला हा विचित्र आजार असल्याने स्वतःचा घाम आणि अश्रूंपासूनही धोका आहे. 

यूकेतील केंटमध्ये राहणारी 19 वर्षीय तरुणाचं नाव एब्बी प्लम्मर (Abbie Plummer) असं आहे. तिची त्वचा इतकी संवेदनशील आहे की पाण्याच्या संपर्कात येताच तिची त्वचा जळते. पाणी लागताच तिच्या त्वचेवर मोठ मोठे फोड येतात. अगदी घाम आणि डोळ्यातील अश्रूंमुळेही तिला हा त्रास होतो. ज्यामुले तिला डोळ्यातील पाणी रोखावं लागतं. घाम येताच तिचा घाम एसिडमध्ये बदलतो आणि तिची त्वचा जळते. पावसाळ्यातही ती घराबाहेर पडत नाही. त्यामुळे ती पाण्यापासून दूर राहते. एब्बी या दुर्मिळ आजाराबाबत विचार करते तेव्हा तिला स्वत: बद्दलच फार वाईट वाटत आणि रडू येतं. पण अश्रू आल्याने तिचा त्रास हा आणखी वाढतो. 

पाण्याचे काही थेंबही शरीरावर जखमा करून जातात

अश्रू सोबतच तिला घामामुळे देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तापमानात थोडी जरी वाढ झाली की ती तिच्यासाठी खूप मोठी शिक्षा असते. पावसाळ्यातही अशाच काहीसा प्रकार आहे. पाण्याचे काही थेंबही तिच्या शरीरावर जखमा करून जातात. तिने काही दिवसांपूर्वी आपल्याला असलेल्या या त्रासाची लोकांना माहिती दिली आहे. एब्बीने दिलेल्या माहितीनुसार, 2018 साली तिला त्वचेची समस्या सुरू झाली. तेव्हा सुरुवातीला डॉक्टरांना वाटलं की कोणत्या शाम्पूमुळे तिला ही समस्या झाली असावी. तिला तशी औषधं देण्यात आली. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. 

एब्बीला Aquagenic Urticaria असल्याचं निदान 

अखेर एब्बीला Aquagenic Urticaria  असल्याचं निदान झालं. ज्यामध्ये पाण्याची एलर्जी असते. पाणी साधं असो वा गरम त्याच्या संपर्कात येताच त्वचेवर त्याचे रिएक्शन होतात. एब्बीने सांगितलं, पाणी प्याल्याने तिला काही त्रास होत नाही. पाणी शरीरात गेल्यावर अशी काही रिएक्शन होत नाही. फक्त अंघोळ केल्यावर किंवा त्वचेवर पाणी पडल्यावर असं होतं. त्यामुळे 10 मिनिटांत पटापट अंघोळ करून ती लगेच आपलं शरीर सुकवते. पण त्यानंतरही तिच्या शरीरावर रॅशेस येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: abbie plummer of uk have rare skin problem skin burns sweat water aquagenic urticaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.