अबू इवान्का अल अमरिकी - डोनाल्ड ट्रम्पचं सीरियन बारसं
By admin | Published: April 8, 2017 12:11 PM2017-04-08T12:11:31+5:302017-04-08T12:19:17+5:30
डोनाल्ड ट्रम्प सीरियामध्ये भलतेच लोकप्रिय झाले असून त्यांचं अबू इवान्का अल अमरिकी म्हणजे इवान्का या अमेरिकीचे पिता असं नामकरण करण्यात आलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल्स डागणारे डोनाल्ड ट्रम्प सीरियामध्ये भलतेच लोकप्रिय झाले असून त्यांचं अबू इवान्का अल अमरिकी म्हणजे इवान्का या अमेरिकीचे पिता असं नामकरण करण्यात आलं आहे. सीरियामध्ये यादवी माजली असून बंडखोरांवर असद यांच्या राजवटीने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अनेक लहान मुलं दगावली असून गेल्या अनेक दशकांमधला हा अपवादात्मक परंतु निघृण रासायनिक हल्ला मानण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध करताना ट्रम्प यांच्या आदेशावरून अमेरिकी सैन्यानं असद यांच्या ज्या लष्करी तळावरून रासायनिक हल्ला केल्याचा संशय होता, त्या तळावर क्षेपणास्त्रांचा तुफानी मारा केला आणि असद सरकारला जबरदस्त धक्का दिला.
हा हल्ला इतका आकस्मिक आणि जोरदार होता की असद यांचा मित्र असलेल्या रशियाने अमेरिकी कारवाईचा निषेध केला तसेच, दोन्ही देशांचे संबंध बिघडतिल असंही बजावलं. मात्र, सीरियातल्या लोकांनी या कारवाईचं कौतुक करताना ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. काहिंनी तर ओबामा यांच्यापेक्षा ट्रम्प कार्यक्षम असून जे बोलतात ते करून दाखवतात असं प्रशस्तीपत्रकही दिलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांच्यावर झालेला कौतुकाचा वर्षाव...
One Syrian tells me the new nom de guerre for President Trump on the ground in Northern Syria is Abu Ivanka al Amriki. #syria
— Clarissa Ward (@clarissaward) April 7, 2017
Hey @realDonaldTrump@POTUS Do you know that your new Name in #Syria Turn to be ( Abu Ivanka Al-Amriki ) ✌️
सीरियाच्या तळावर गुरूवारी हल्ला करण्यात आला आणि सुमारे 60 टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, रशियाच्या सैन्याची हानी होणार नाही याची काळजी अमेरिकी लष्करानं घेतली होती, त्यामुळे रशिया व अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्ष अद्याप तरी झालेला नाही. मात्र, रशिया हा सीरियाचा धोरणात्मक भागीदार असल्याने रशिया अमेरिका संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.