चॅलेन्ज! बिबट्या नाही, शोधून दाखवा 'या' फोटोतली रानमांजर; भले-भले थकले! बघा- तुम्हाला जमतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 03:12 PM2022-03-07T15:12:17+5:302022-03-07T15:13:41+5:30
लोकांनी ही मांजर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक युजर्सना मांजर दिसली. अनेक जन शोधून-शोधून थकून गेले. तर अनेकांना एका मांजरी ऐवजी दोन-दोन मांजरीही दिसल्या...
सामानाने गच्च भरलेल्या एखाद्या रूममध्ये सुई सापडेल, पण एखाद्या फोटोत बिबट्या सापडवून दाखावा म्हटलं तर..., मुळात बिबट्या असतोच तसा, तो असतो जवळच, पण सहजपणे दिसत नाही. कदाचित, आपण यापूर्वी अनेक फोटोंमध्ये बिबट्या शोधलाण्याचा प्रयत्न केला असेल, नव्हे शोधलाही असेल. मात्र, आता एक असा फोटो हाती आला आहे, ज्या फोटोने सर्वांनाच गुडघे टेकायला भाग पाडले आहे. या फोटोत एक रानमांजर लपलेली आहे. पण तीही अशा पद्धतीने लपली आहे, की सापडणेही अवघड आहे. मी-मी म्हणणाऱ्यांनाही या फोटोत ती शोधणे कठीन जात आहे.
If the cats are rather bulky, have edges and look grumpy, I see two. pic.twitter.com/lHJrFWuAkr
— Christian Schwägerl (@chrschwaegerl) March 6, 2022
आपण शोधू शकता? -
Birding Beijing नावाच्या एका ट्विटर युजरने हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, आपल्या पैकी अनेकांनी हीम बिबट्या शोधण्याचा खेळ खेळला असेल, पण या फोटोतील Pallas Cat तुम्ही शोधू शकता का? या जंगली मांजरी जंगलात दिसणे फार कठीण आहे, यात आश्चर्य नाही.
I thought that at first, but, there is (as someone below pointed out). Zoom in and look under arrow…😁 pic.twitter.com/v61KOfmqvl
— Claire Wilson (@MissClaire_75) March 6, 2022
लोक करतायत प्रयत्न -
लोकांनी ही मांजर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक युजर्सना मांजर दिसली. पण अनेक जन शोधून-शोधून थकून गेले. त्यांना मांजर दिसली नाही. एवढेच नाही, तर या फोटो मांजर वैगेरे काही नाही, असेही काही जण म्हणाले. अनेक लोकांना एका मांजरी ऐवजी दोन-दोन मांजरीही दिसल्या. युजर्सनी याचे स्क्रिनशॉटदेखील शेअर केले.
— Emma ° ° Rose ❄️🐇 (@inthebarberry) March 6, 2022
काहींनी तर हा फोटो झूम करूनही शेअर केला -
काही लोकांनी या फोटोतील मांजर दाखवण्यासाठी तो झूम करूनही शेअर केला आहे. आता, या फोटोत आपल्यालाही अगदी स्पष्टपणे मांजर दिसत असेल.
— Satyadeep Nag (@NagSatyadeep) March 6, 2022
खरे सांगा, आपल्याला स्वतःहून ही मांजर सापडली? की आपल्याला लोकांनी शेअर केलेल्या फोटोंची मदत घ्यावी लागली? खरे तर आपणही आपल्या मित्रांनाही हा फोटो शेअर करून, ते यात मांजर शोधू शकतात का? असा प्रश्नही विचारू शकता.