Video : Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 09:32 AM2021-12-23T09:32:41+5:302021-12-23T09:33:59+5:30
Trending News: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाल यांनी एक मीम व्हिडीओ शेअर केला आहे.
Trending News: देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं देशात हाहाकार माजवला होता. त्यातून स्थित होतो ना होतोच तर आता ओमायक्रॉन या व्हेरिअंटची भीती पसरली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंट हा अधिक संसर्ग करत असला तरी तो डेल्टा व्हेरिअंटप्रमाणे घातक नसल्याचं अनेक वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिअंटबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियाही मिळाली आहे. पूनावाला यांनी हॉलिवूडचा चित्रपट होम अलोनचा एक सीन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
What's going on here!?
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 22, 2021
Video Credit: @JohnsHopkinsSPHpic.twitter.com/ya31qoxdEW
या व्हिडीओमध्ये चोर घरात शिरले असून एक मुलगा त्या दोन चोरांचा कसा सामना करतो हे दाखवण्यात आलंय. परंतु हा व्हिडीओ एडिट करण्यात आलाय. यामध्ये मुलाला पकडण्यात आलेल्या दोन जणांपैकी एकाला डेल्टा आणि एकाला ओमायक्रॉन हे नाव देण्यात आलं आहे. तर आपल्या बचावासाठी तो फेकत असलेल्या वस्तूंपैकी एकाला लस आणि दुसऱ्याला बुस्टर डोस असं संबोधण्यात आलंय.