क्या बात! World's Best Mommy ठरला एक पिता, पण एका पुरूषाला कसा मिळाला हा मान?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 12:15 PM2020-03-06T12:15:46+5:302020-03-06T12:19:40+5:30
पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना World's Best Mommy हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'बेस्ट मॉम' हा पुरस्कार म्हटलं तर अर्थातच सर्वांनाच हे वाटणं सहाजिक आहे की, हा पुरस्कार एखाद्या महिलेला मिळत असेल. पण नाही. हा पुरस्कार एका पुरूषाला मिळाला आहे. सध्या सोशल मीडियात याचीच चर्चा रंगली आहे. आता कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, 'बेस्ट मॉम' हा पुरस्कार एका पुरूषाला कसा मिळाला? चला जाणून घेऊन याचं उत्तर....
पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना World's Best Mommy हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ८ मार्चला म्हणजे जागतिक महिला दिनाला बंगळुरू येथील एका कार्यक्रमात आदित्यना हा पुरस्कार दिला जाणार आहे. आदित्यने २०१६ मध्ये डाउन सिंड्रोमने ग्रस्त एका बाळाला दत्तक घेतलं होतं. ज्यासाठी त्यांना मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा द्यावा लागला. पण त्याची ममता इथे जिंकली.
इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना आदित्यने सांगितले की, 'जगातल्या सर्वश्रेष्ठ मातांपैकी एक होण्याचा सन्मान मिळाल्याने मी आनंदी आहे आणि इतरांसोबत मला माझं स्पेशल बाळ सांभाळण्याचा अनुभव शेअर करायचा आहे'. आदित्यने या बाळाला सिंगल पॅरेंट रूपात दत्तक घेतलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी २२ महिन्याच्या अवनीशला दत्तक घेतल्यावर सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडली आणि देशभरातील स्पेशल मुलांच्या पालकांना काउन्सेलिंग आणि मोटिवेट करण्याच्या कामात वाहून घेतले.
आदित्य यांनी २०१६ मध्ये अवनीशला दत्तक घेतलं. पण आदित्यला या मुलाला दत्तक घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागली. साधारण दीड वर्षांच्या संघर्षानंतर तो अवनीशला घरी आणू शकला. यात त्याला सामाजिक आणि घरातूनही विरोध झाला. अवनीशला त्याची आई एका अनाथालयात सोडून गेली होती. मात्र, आदित्यने त्याला कधीच आईची कमतरता भासू दिली नाही.
बाप-लेकाची ही जोडी २२ राज्यांमध्ये जाऊन आली आहे. तिथे आदित्य यांनी ४०० ठिकाणी मीटिंग्स, वर्कशॉप, टॉक्स आणि कॉन्फरन्स केली. आदित्यने सांगितले की, 'आम्ही जगभरातील १० हजार पालकांशी जुळलेले आहोत. आम्हाला संयुक्त राष्ट्र द्वारे आयोजित एका संमेलनातही बोलवण्यात आले होते.