हिटरलची पत्नी इवा ब्राउनच्या अंडरगारमेंट्सला लिलावात मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:10 PM2022-11-30T17:10:13+5:302022-11-30T17:12:28+5:30

आता तुम्ही म्हणाल की, आता इवा ब्राउनची कशासाठी आठवण काढली. तर ती अशासाठी की, गेल्या गुरूवारी एका लिलावात इवाच्या अंडरगारमेंट्सवर बोली लावण्यात आली.

Adolf Hitler's wife's underpants sell in auction 4620 dollar | हिटरलची पत्नी इवा ब्राउनच्या अंडरगारमेंट्सला लिलावात मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्...

हिटरलची पत्नी इवा ब्राउनच्या अंडरगारमेंट्सला लिलावात मिळालेली किंमत वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

जगभरात आपल्या हिंसाचारासाठी कुख्यात असलेल्या अ‍ॅडॉल्फ हिटलरला कुणीही विसरू शकत नाही. हिटलरसोबतच त्याचे रिलेशनशिपची आजही चर्चा होते. त्याची पत्नी इवा ब्राउनच्या सुंदरतेच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात. 

आता तुम्ही म्हणाल की, आता इवा ब्राउनची कशासाठी आठवण काढली. तर ती अशासाठी की, गेल्या गुरूवारी एका लिलावात इवाच्या अंडरगारमेंट्सवर बोली लावण्यात आली. या लिलावात एका व्यक्तीने इवाचे अंडरगारमेंट्स ३७०० पाउंड म्हणजेच ३,२३,४१६ रूपयांना खरेदी केले. ही व्यक्ती ब्रिटनची असून त्याच्याकडे अनेक दुर्मीळ वस्तू संग्रहित आहेत.

तसेच एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून लिलावात भाग घेतला होता. त्याने इवा ब्राउनचा नाइट गाउन २,६०० पाउंड(२,२७,२४८ रूपये) ला खरेदी केला. लिलावात तिच्या सर्वच वस्तूंच्या अंदाजे किंमतीच्या सात पटीने अधिक किंमत मिळाली.

ब्रिटीश ऑक्शन हाऊस हम्बर्ट आणि एलिसने हिटलरची पत्नी इवा ब्राउनच्या अनेक वस्तू लिलावात ठेवल्या होत्या. ज्या द्वितीय महायुद्धादरम्यान इवाने वापरल्या होत्या. पण लोकांची सर्वाधिक उत्साह हा इवा ब्राउनच्या अंडरगारमेंट्स खरेदी करण्यात होता. 

लिलावादरम्यान नाझी नेता हरमन गोइंगच्या पत्नीची एक स्वस्तिक चिन्ह असलेली सोन्याची बांगडी देखील विकली गेली. हिटलर आणि इवाने १९४५ मध्ये लग्न केलं होतं. पण लग्नाच्या एक दिवसानंतरच इवाने आत्महत्या केली होती. याआधीही २०१६ मध्ये झालेल्या लिलावात रत्नजडीत अंगठी, चांदीचा आरसा लावलेला बॉक्स आणि चांदीचा आणखी एक बॉक्स ज्यात इवाची लाल लिपस्टीकचा लिलाव करण्यात आला होता.

Web Title: Adolf Hitler's wife's underpants sell in auction 4620 dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.