सुंदर क्षण! तब्बल 12 वर्षांनी मुलगी अन् नातीला भेटली वृद्ध हत्तीण, तिघींचं प्रेम पाहून भावूक झाले लोक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 09:58 AM2020-08-26T09:58:54+5:302020-08-26T09:59:54+5:30
यावेळी त्यांनी एकमेकींच्या सोंडीने आपलं प्रेम व्यक्त केलं. हा सुंदर आणि तेवढाच भावूक क्षण एका फोटोग्राफरने कॅमेरात कैद केलाय. आता हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
३ हत्तींणींचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल झालाय. कारण या फोटोन सर्वांनाच भावूक करून सोडलंय. हा फोटो आहे जर्मनीतील एका प्राणी संग्रहालयातील. इथे एक वृद्ध हत्तीणीची तब्बल १२ वर्षांनी तिच्या मुलीसोबत आणि नातीसोबत भेट झाली. यावेळी त्यांनी एकमेकींच्या सोंडीने आपलं प्रेम व्यक्त केलं. हा सुंदर आणि तेवढाच भावूक क्षण एका फोटोग्राफरने कॅमेरात कैद केलाय. आता हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
३९ वर्षीय हत्तीण पोरीला तिच्या जुन्या घरून मध्य जर्मनीतली हल्ले शहरातील Bergzoo मध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. जिथे ती तिच्या १९ वर्षीय मुलीला तब्बल १२ वर्षानी भेटली. इतकेच नाही तर ती पहिल्यांदा आपल्या ४ वर्षीय नात Tamika ला सुद्धा भेटली. सर्वांनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या सोंडेने एकमेकांना टच केलं.
Granny never forgot you! A sweet but sad moment elephant touches trunks with her daughter and granddaughter at German zoo after 12 years' separation. Naturally female family members stay together, so this is good, but elephants don’t belong in zoos. 💔🐘https://t.co/pRjVpBgfSl
— Xpose Trophy Hunting (@XposeTrophyHunt) August 24, 2020
सध्या पोरीला तिच्या मुलीपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. मात्र, पुढील काही दिवसात त्यांना सोबत ठेवण्याची योजना आहे. जेणेकरून त्या दोघी पुन्हा सोबत राहू शकतील. पोरी ही एक आफ्रिकन हत्तीण आहे. तिला जन्म १९८१ मध्ये झिम्बॉम्वेच्या जंगलात झाला होता. तिथे ती १९८३ ते १९९७ पर्यंत राहिली आणि २००१ मध्ये तिला आपलं पहिलं पिल्लू Tana ला जन्म दिला.
@TRUNKUPWines Granny never forgot you! Adorable moment elephant touches trunks with her daughter and granddaughter at German zoo after 12 years' separation
— Pippa Ettore (@pettore) August 24, 2020
: )))) pic.twitter.com/n13oMpvwRP
जंगलात हत्ती नेहमी एकत्र एका परिवारासारखे राहतात. आणि प्रत्येक फॅमिलीचा एक लिडर असतो जे ग्रुपचं नेतृत्व करतात. असे सांगितले गेले की, हत्तींमध्ये आई आणि मुली सोबत राहतात. तर तरूण मुलं ग्रुप सोडतात. हत्तीणींचा हा फोटो पाहून लोक फारच भावूक झाले आहेत.
तब्बल 12 वर्षांनी मुलगी अन् नातीला भेटली वृद्ध हत्तीण, तिघींचं प्रेम पाहून भावूक झाले लोक!
बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...
Video : नेमकं स्फोटावेळी जन्माला आलंं हे बाळ, व्हिडीओ पाहून लोक म्हणू लागले - George The Miracle!