वकिलाची न्यायाधीशांनाच धमकी
By admin | Published: July 16, 2016 03:24 AM2016-07-16T03:24:01+5:302016-07-16T03:24:01+5:30
न्यायाधीशांना ‘मायलॉर्ड’ म्हणणारे वकीलच प्रसंगी भान सोडून न्यायाधीशांना धमकी देत असल्याचे उदाहरण शुक्रवारी उघडकीस आले.
मुंबई : न्यायाधीशांना ‘मायलॉर्ड’ म्हणणारे वकीलच प्रसंगी भान सोडून न्यायाधीशांना धमकी देत असल्याचे उदाहरण शुक्रवारी उघडकीस आले. उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश न्या. एम. एस. सोनक यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्याची निंदा करण्याचे धाडस काही वकिलांनी केले. त्यामुळे न्या. सोनक यांनी वरिष्ठ सहकाऱ्याची निंदा करणाऱ्या वकिलांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्या वकिलांना न्या. सोनक यांना ‘पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे वकिलांच्या या टोळक्यात एका ज्येष्ठ वकिलाचाही समावेश होता.
न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांचे खंडपीठ
बसते. सकाळी कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी एक ज्येष्ठ वकील व काही वकील न्या. सोनक यांच्या चेंबरमध्ये कामानिमित्त गेले. चर्चा वाढत गेली. चर्चेदरम्यान
या वकिलांनी न्या. कानडे यांच्याविषयी उलटसुलट चर्चा
केली. संबंधित वकील आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याचा अनादर करत आहेत, हे सहन न झाल्याने न्या. सोनक यांनी संबंधित वकिलांना ताकीद दिली. (प्रतिनिधी)