Video : विमान आकाशातून पडलं अन् तारांमध्ये अडकलं, जाणून घ्या पुढे काय झालं....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:27 PM2019-10-16T13:27:05+5:302019-10-16T13:37:22+5:30
विमान आकाशात किती उंच उडतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण जरा अशी कल्पना करा की, विमान उडता-उडता अपघात होऊन अचानक तारांमध्ये अडकलं तर? धक्का बसेल ना!
विमान आकाशात किती उंच उडतं हे सर्वांनाच माहीत आहे. पण जरा अशी कल्पना करा की, विमान उडता-उडता अपघात होऊन अचानक रोप-वे च्या तारांमध्ये अडकलं तर? धक्का बसेल ना! अशीच एक घटना इटलीमध्ये घडली आहे. इथे एका प्रवासी विमानाचा अपघात झाला असून हे विमान काही फूट उंचीवर तारांवरच लटकून राहिलं. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सुदैवाने यातील पायलट आणि प्रवासी सुखरूप आहे. कुणालाही काहीही झालं नाही. ही घटना रविवारी घडल्याची माहिती असून या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यात विमान रोप-वे च्या तारांवर कसं अडकून आहे हे स्पष्ट दिसत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या धक्कादायक घटनेनंतर विमानातील ६२ वर्षीय पायलट गुंतलेल्या तारांमधून बाहेर येण्यास यशस्वी ठरला. तर एक दुसरी ५५ वर्षीय व्यक्ती या तारांमध्ये अडकून राहिली. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे बघितलं जाऊ शकतं की, उलट्या लटकलेल्या विमानाच्या पंखांवर बसलेली व्यक्ती कशा स्थितीत आहे.
जेव्हा बचाव पथकाला या घटनेची माहिती मिळाली तेव्ही बचाव पथकाच्या टीमने २ तासांच्या अथक परिश्रमानंतर सर्वांना सुरक्षित खाली उतरवले. मिळालेल्या माहितीनुसार, मिलान शहराजवळील एअरपोर्टवरूनच विमानाने उड्डाण घेतलं होतं. पण उड्डाण घेतल्यावर काही क्षणातच विमानाचं संतुलन बिघडलं आणि ते तारांमध्ये जाऊन अडकलं.
सुदैवाने हे विमान अपघातानंतर तारांमध्ये अडकून राहिलं हे चांगलं झालं. नाही तर विमान जमिनीवर पडून क्रॅश झालं असतं. तसेच पायलटसह यातील प्रवाशांचा जीवही धोक्यात आला असता.