सरकारचा विरोध करण्यासाठी महिलांनी शिवून घेतले ओठ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:56 PM2019-07-05T12:56:12+5:302019-07-05T13:01:34+5:30

सरकारचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. णी रास्ता रोको करतं, कुणी काळे झेंडे दाखवतात, कुणी उपोषण करतं, कुणी मोर्चे काढतं.

Afghan women candidates sew lips protest againts government | सरकारचा विरोध करण्यासाठी महिलांनी शिवून घेतले ओठ!

सरकारचा विरोध करण्यासाठी महिलांनी शिवून घेतले ओठ!

googlenewsNext

सरकारचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. कुणी रास्ता रोको करतं, कुणी काळे झेंडे दाखवतात, कुणी उपोषण करतं, कुणी मोर्चे काढतं, पण अफगाणिस्तानमध्ये एक वेगळंच आणि धक्कादायक चित्र बघायला मिळालं. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाच महिलांनी सरकारचा विरोध करण्यासाठी चक्क आपले ओठ शिवले आहेत.

काय आहे कारण?

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्यावर्षी निवडणुकांमध्ये झालेल्या कथित गोंधळाबाबत या महिलांनी राष्ट्रपती भवनासमोर ओठ शिवून आपला विरोध दर्शवला. या पाचही महिला निवडणुकींमध्ये पराभूत झाल्या होत्या. महिलांचं म्हणणं आहे की, निवडणुकांमध्ये गोंधळ झाला, ज्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. एका महिला डॉक्टरकडून या महिलांनी आपले ओठ शिवून घेतले.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे विरोध

(Image Credit : iranpress.com)

या महिला गेल्या ३ महिन्यांपासून सरकार विरोधात प्रदर्शन करत आहेत. त्यांचं म्हणनं आहे की, जे या निवडणुकीत विजयी झाले आहेत, ते पैशांच्या माध्यमातून संसदेत पोहोचले. यांच्यासोबतच आणखी ९ महिलांनी उपोषण सुरू केलं आहे. या महिलांची मागणी आहे की, निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाबाबत एक कमिटी बसवली जावी आणि चौकशी केली जावी.

Web Title: Afghan women candidates sew lips protest againts government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.