बाबो! तुम्ही कधी ८ पायांचा पक्षी पाहिलाय का? या पक्ष्याबाबत वाचून व्हाल थक्क.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:13 AM2021-04-08T10:13:42+5:302021-04-08T10:19:23+5:30
या फोटोत एक पक्षी त्याच्या आठ पायांनी चालतो असं दिसतं. हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो. चला जाणून घेऊ या अनोख्या पक्ष्याबाबत..खरंच त्याना आठ पाय असतात का?
निसर्गाने असे काही जीव तयार केले ज्यांच्याकडे बघून विश्वास बसत नाही. तुम्ही कधी आठ पायांचा पक्षी पाहिलाय का? नसेल पाहिला तर आता बघा. या फोटोत एक पक्षी त्याच्या आठ पायांनी चालतो असं दिसतं. हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो. चला जाणून घेऊ या अनोख्या पक्ष्याबाबत..खरंच त्याना आठ पाय असतात का?
या पक्ष्यांची खासियत म्हणजे अंडी दिल्यानंतर मादा पक्षी दुसरा जोडीदार शोधते. अशात नव्या जकाना पक्ष्याला जुन्या जोडीदारासोबत लढाई करावी लागते. यात जो जिंकतो त्याला मादा पक्ष्याच्या हरममध्ये जाण्याची परवानगी मिळते आणि संबंध ठेवण्याची परवानगी मिळते.
या प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये मादा पक्षी अंडी देऊन खाण्या-पिण्यासाठी निघून जाते. त्यांच्यात नर आणि मादा यांच्यात कामावरून काही भेद नसतात. दोघे मिळून सगळी कामे करतात. हे आफ्रिकन जकाना पक्षी साधारण ३० सेंटीमीटर लांब असतात तेच मादा पक्षी नराच्या तुलनेत आकाराने मोठा असतो.
हे पक्षी प्रामुख्याने आफ्रिकेतच आढळतात. त्यांची ओळख त्यांच्या अनोख्या पायांमुळेच होते. त्यांचे पाय बगळ्यांप्रमाणे लांब असतात आणि त्याचे पंजे पसरलेले असतात. हे पक्षी आपल्या पायांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
आफ्रिकन जकानाला दोनच पाय असतात. मग म्हणाल की, फोटोत इतके पाय कसे दिसतात? तर याची कहाणी मजेदार आहे. नर पक्ष्याला आपल्या पिल्लांची काळजी घ्यायची असते. ते पित्याची महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा पिल्लं लहान असतात तेव्हा जकाना पक्षी त्यांना आपल्या पंखात लपेटून जमिनीवरून थोडं वर धरतात. पिल्लांना ते पंखात लपवतात. पण त्यांचे पाय बाहेर राहते. त्यामुळे बघताना असं वाटतं की, त्यांचे इतके पाय आहेत.