डोळे भरुन पाहायचे होते 10 मिलियन डॉलर; म्हणून त्यानं...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:07 PM2019-04-08T17:07:57+5:302019-04-08T17:11:36+5:30
मोठ मोठ्या आकड्यांची रक्कम प्रत्यक्षात बघायची होती म्हणून....
कागदांवरील रुपया-पैशांचे आकडे तर तुम्ही नेहमीच पाहिले असतील. कागदांवर इतकी रक्कम लिहिलेली असणं सामान्य बाब आहे. पण हे मोठाले आकडे असलेली रक्कम प्रत्यक्षात कशी दिसते? खासकरून तेव्हा जेव्हा ही रक्कम तुमची असते. ती सुद्धा कॅशमध्ये. नायजेरियाचा खबरपती आहे अलिको डंगोटे. हा आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितला जातो. यालाही असाच काहीसा अनुभव घ्यायचा होता.
अलिकोने एका मुलाखतील सांगितले की, एकदा त्याने त्याच्या अकाऊंटमधून १० मिलियन डॉलर म्हणजे ६९.२ कोटी रूपयांची कॅश काढली. त्याला इतकी रक्कम केवळ पहायची होती. त्याने सांगितले की, 'मला फक्त हे पैसे पहायचे होते. कागदावर दिसणारे मोठमोठे आखडे प्रत्यक्षात कसे असतात हे बघायचं होतं'.
अलिको सांगतात की, 'जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा एक मिलियन सुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. पण त्यानंतर आकडे फार महत्त्वाचे वाटत नाही. अशात तुमच्या हे लक्षात येत नाही की, तुमच्याकडे असलेल्या पैशांचा अनुभव कसा असतो'.
पैसे काढले पुन्हा बॅकेत जमा केले
अलिको हे एक दिवस बॅंकेत गेले. त्यांनी १० मिलियन डॉलरची कॅश काढली. हे पैसे कारच्या डिक्कीमध्ये टाकले. घरी येऊन पैसे त्यांनी घरात सजवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बॅंकेत जमा केलेत. ते सांगतात की, 'आता मला विश्वास होत नाहीये की माझ्याकडे इतके पैसे आहेत'.
अलिको नायजेरियामध्ये उद्योगपती आहेत. ते Dangote Group ते मालक आहेत. आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलिको यांच्याजवळ १०.७ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.