तीन लेकरं झाल्यावर पतीने चेंज केलं जेंडर, पतीचा बनला पत्नी; मग ती म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 03:07 PM2024-06-12T15:07:51+5:302024-06-12T15:08:37+5:30
सगळ्यांचं होतं तसंच दोघांचं लग्न झालं होतं. ते नवरी नवरदेव होते. पण लग्नाच्या १८ वर्षानंतर कपलपैकी एकही जण पुरूष नाही. पत्नीसाठी पतीने लिंग परिवर्तन केलं.
आजकाल कपल एकमेकांसाठी काय काय करतात हे अनेकदा समोर येत असतं. एकमेकांच्या प्रेमासाठी विश्वास बसणार नाही अशा गोष्टी करतात. अशाच एका कपलबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या कपलची लव्हस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सगळ्यांचं होतं तसंच दोघांचं लग्न झालं होतं. ते नवरी नवरदेव होते. पण लग्नाच्या १८ वर्षानंतर कपलपैकी एकही जण पुरूष नाही. पत्नीसाठी पतीने लिंग परिवर्तन केलं.
कपलने त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आणि याबाबत सांगितलं. पतीचं नाव शाये स्कॉट (Shaye Scott) तर पत्नीचं नाव अमांडा स्कॉट (Amanda Scott) आहे. दोघेही अमेरिकेच्या ऊटामधील सेंट जॉर्जमध्ये राहतात. यूट्यूब व्हिडीओवरही दोघांनी त्यांची कहाणी शेअर केली. दोघांचं लग्न २००६ साली झालं होतं. २०१२ मध्ये त्यांना एक मुलगी आणि त्यानंतर दोन वर्षानी एक मुलगा झाला. त्यानंतर २०१८ मध्ये तिसरं बाळ झालं. पण यानंतर शायला जीवनात काहीतरी कमी जाणवली. तो पत्नीसोबत बोलला. पत्नीच्या सहमतीनंतर त्याने जेंडर चेंज केलं आणि पतीचा पत्नी बनला.
अमांडाने सांगितलं की, "२०१९ मध्ये शायने मला त्याचं सत्य सांगितलं. मला वाटलं यात काहीच चुकीचं नाही. सोबतच मला हेही समजलं की, ट्रांसजेंडर असणं म्हणजे कुणाला नुकसान पोहोचवत नाही". ती म्हणाली की, "ट्रांसजेंडर लोग समस्या नाहीत. ते जिवंत आणि अद्भुत आहेत".
गेल्या ३१ मे रोजी दोघांनी त्यांच्या लग्नाचा १८वा वाढदिवस साजरा केल. इन्स्टावर शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्यांनी सांगितलं की, ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांना अनेक वर्ष आपल्या व्यक्तित्वाच्या वेगवेगळ्या वर्जनसोबत प्रेम करण्याची संधी मिळते. काही लोक या कपलचं समर्थन करत आहेत तर काही लोक टिका करत आहेत.
एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, "तुमच्या मुलांकडे दोन प्रेम करणारे आई-वडील आहेत. त्यांना याचा काहीच फरक पडत नाही की, ते कोणत्या लिंगाचे आहेत". दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, "व्हिडीओत पतीचा फोटो बघून मला वाटलं तो मरण पावला. पण मला आता याचं दु:खं आहे की, तो मरण पावला नाही".