अजब प्रेम की गजब कहानी: प्रेयसीची दोन झालेली लग्ने मोडली, मग स्वत: बनला नवरदेव....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:45 PM2022-07-27T16:45:02+5:302022-07-27T16:46:42+5:30
नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं.
बिहारच्या सारण जिल्ह्यातू एक अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला मिळवण्यासाठी तिची दोन-दोन लग्ने मोडली. मग कुटुंबियांच्या विरोधानंतरही गावातील लोकांच्या उपस्थितीत मंदिरात तिच्यासोबत लग्न केलं. प्रकरण रामपूर रूद्र येथील आहे. इथे ठाकुरवाडी मंदिरात प्रियकराने प्रेयसी बबीतासोबत सात जन्म साथ निभावण्याची शपथ घेतली.
रामपूर रूद्र येथे राहणारा नीरजचं हंसापिर गावात राहणाऱ्या बबीतासोबत अफेअर होतं. दोघांचेही कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते. यादरम्यान बबीताच्या कुटुंबियांनी तिचं लग्न 2021 मध्ये एका दुसऱ्या तरूणासोबत ठरवलं. नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं.
लोकांचा विचार करून बबीताचे वडील तिचं लग्न नीरजसोबत लावून देण्यास तयार झाले. पण नीरजच्या कुटुंबियांनी तिच्या घरच्या लोकांना 2 लाख रूपये हुंडा मागितला. बबीताचे वडील दोन लाख रूपये देऊ शकत नव्हते. कारण त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण नीरजच्या घरचे लोक हुंड्यावर अडून बसले. अशात नाइलाजाने बबीताच्या वडिलांनी तिचं लग्न जगदीशपूरमध्ये राहणाऱ्या एका दुसऱ्या तरूणासोबत करून दिलं.
बबीताचं दुसरं लग्न होऊनही नीरजच्या डोक्यातून प्रेमाचं भूत काही गेलं नाही. तो पुन्हा बबीताच्या सासरी पोहोचला. तिथे त्याने बबीता आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून येथील सासरच्या लोकांनीही बबीताला माहेरी परत पाठवलं.
नीरजच्या या कृत्यामुळे बबीताही वैतागली. ती वडिलांसोबत रामपूर चंद्रला पोहोचली आणि सरपंचाला सगळं काही सांगितलं. नीरज आणि त्याच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलं. नीरज बबीतासोबत लग्न करण्यास तयार झाला. पण दुसऱ्या दिवशीच त्याने नकार दिला. मग बबीता आणि तिचे वडील पोलिसात गेले व त्यांनी न्यायाची मागणी केली.
नीरजची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते तेव्हा तो सापडला नाही. त्याचा शोध सुरूच होता. मग सोमवारी अचानक नीरज बबीताकडे पोहोचला आणि लग्नासाठी तयार झाला. नीरजच्या घरचे लोक बबीताला स्वीकारण्यास तयार नव्हते. तरीही नीरजने गावकऱ्यांच्या साक्षीने बबीतासोबत लग्न केलं.