अरे देवा! पतीच्या मृत्यूनंतर 'ती' भावाच्या प्रेमात पडली; पंचायतीसमोर लग्नासाठी अडून बसली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 05:35 PM2022-03-05T17:35:28+5:302022-03-05T17:36:50+5:30
बहिणीचा भावावरच जीव जडला. पतीच्या मृत्यूनंतर ती भावाच्या प्रेमात पडली आणि आता पंचायतीसमोर लग्नासाठी अडून बसल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. अजब प्रेमाचे अनेक गजब किस्से हे अनेकदा ऐकायला देखील मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. बहिणीचा भावावरच जीव जडला. पतीच्या मृत्यूनंतर ती भावाच्या प्रेमात पडली आणि आता पंचायतीसमोर लग्नासाठी अडून बसल्याची घटना घडली आहे. बिहारच्या पश्चिमी चंपारण जिल्ह्यातील बानूछापरमधील हे प्रकरण आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सर्वत्र फक्त याचीच चर्चा रंगली आहे.
चंदा असं या तरुणीचं नाव असून ती आपला मावसभाऊ सुनील कुमारच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट तिने धरला. पंचायतीसमोर देखील हे प्रकरण गेलं. त्यानंतर या बहीण-भावांचं लग्न न लावून देण्याचा आदेश देण्यात आला. पण महिलेने सर्वांसमोर काहीही झालं तरी ती आपल्या भावाशी लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणीच्या पतीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यामुळे ती एकटी पडली होती. या एकटेपणात ती आपल्या मावसभावाच्या जवळ आली. त्याच्या प्रेमात पडली आणि आता तिला त्याच्याशी लग्नही करायचं आहे.
महिलेच्या कुटुंबाने या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांना हे लग्न होऊ द्यायचं नाही आहे. घरच्यांनीच नाही तर शेजाऱ्यांनाही जेव्हा बहिण-भावाच्या प्रेमप्रकरणाबाबत आणि ते लग्न करणार असल्याबाबत समजलं तेव्हा त्यांनीही यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही कुणाचंच ऐकलं नाही. अखेर दोघांनाही शिक्षा देण्यासाठी गुरुवारी रात्री पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीतही त्यांना शिक्षा देण्याचा निर्णय झाला. पण तरुणीने आपलं लग्न व्हावं यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून मदत मागितली.
बानुछापर पोलीस ठाण्यातही याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी जमावापासून वाचवून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांनाही तिथं बोलावलं. चंदा सुनीलपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. सुनीलने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं आहे. पण कुटुंब या लग्नापासून आनंदी नाहीत. ते विरोध करत आहेत. तर चंदाने सांगितलं की, दोघांचं एकमेकांसोबत लग्न होण्याचे जे काही परिणाम होतील ते होऊदे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.