बिल गेट्स यांच्याशी घटस्फोटानंतर मालामाल झाल्या मेलिंडा गेट्स, वाचा किती मिळाली संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:31 AM2021-05-07T09:31:21+5:302021-05-07T09:32:42+5:30

Bill Gates-Melinda Gates Divorce : अनेकांना बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला आहे. बिल गेट्स यांच्यापासून वेगळ्या झाल्यानंतर मेलिंडा गेट्स अब्जाधीश झाल्या आहेत.

After divorce Melinda Gates becomes billionaire, Will get stock billions of dollars | बिल गेट्स यांच्याशी घटस्फोटानंतर मालामाल झाल्या मेलिंडा गेट्स, वाचा किती मिळाली संपत्ती!

बिल गेट्स यांच्याशी घटस्फोटानंतर मालामाल झाल्या मेलिंडा गेट्स, वाचा किती मिळाली संपत्ती!

googlenewsNext

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स  (Bill Gates) यांनी आपली पत्नी मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांच्याबरोबरचा आपला २७ वर्षांचा संसार मोडला. अनेकांना बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला आहे. बिल गेट्स यांच्यापासून वेगळ्या झाल्यानंतर मेलिंडा गेट्स अब्जाधीश झाल्या आहेत. मागील काही दिवसात मेलिंडाकडे दोन अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे बिल गेट्स यांनी स्थापन केलेली सर्वात मोठी कंपनी कॅक्सेड इन्व्हेस्टमेंटमध्येदेखील (Cascade Investment) मोठी भागीदारी मिळाली आहे.

घटस्फोटाच्या घोषणेनंतर अर्थातच मेलिंडा यांना संपत्ती किती मिळणार किंवा घटस्फोटाची सेटलमेंट कितीत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर मेलिंडा यांना बिल गेट्सच्या कॅस्केड इन्व्हेस्टमेंटने (Cascade Investment) मेक्सिकोच्या दोन सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये शेअर दिले आहेत. (हे पण वाचा : प्रेमासाठी कायपण! बिल गेट्स यांनी लग्नाआधी मेलिंडासमोर आपल्या गर्लफ्रेन्डबाबत ठेवली होती 'ही' एक अट....)

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार एका रिपोर्टनुसार या आठवड्यात कॅस्केड इन्व्हेस्टमेंटने मेंलिडा यांना जवळपास १.८ अब्ज डॉलर किंमतीचे कॅनेडियन नॅशनल रेल्वे कंपनी आणि ऑटोनेशन इंक कंपनीचे शेअर दिले आहेत. कॅस्केड इन्व्हेस्टमेंटकडे सध्या ५० अब्ज डॉलरहून अधिक मूल्याचे शेअर आहेत. यामध्ये रिपब्लिक सर्व्हिसेस इंक, डीअर अ‍ॅंड कंपनी आणि इकोलॅब इंक यांचा समावेश आहे.

घटस्फोटानंतरही फाऊंडेशनमध्ये एकत्र काम

मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्याकडून बिल अ‍ॅंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन नावाची सामाजिक संस्था चालवली जाते. घटस्फोटानंतरही हे दोघे बिल अ‍ॅंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करणार आहेत. बिल अ‍ॅंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे कार्यालय सिएटल येथे आहे. या संस्थेची २०१९ मध्ये एकूण संपत्ती ४३.३ अब्ज डॉलर इतकी होती. (हे पण वाचा : Melinda-Bill Gates Love story : कशी होती बिल गेट्स यांची लव्हस्टोरी? इतक्या श्रीमंत माणसालाही आधी मिळाला होता नकार.....)

बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी स्थापन केलेली मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कॉम्प्युटरच्या क्षेत्रात आजही आघाडीची कंपनी आहे. मागील कित्येक वर्षे जगातील श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पहिल्या तीन किंवा पाच क्रमांकामध्ये असतात. एकेकाळी काही वर्षे सतत बिल गेट्स हेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
 

Web Title: After divorce Melinda Gates becomes billionaire, Will get stock billions of dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.