पतीची नसबंदी केल्यावरही गर्भवती झाली पत्नी, हॉस्पिटलकडे केली नुकसान भरपाईची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:17 PM2024-11-02T14:17:19+5:302024-11-02T14:17:57+5:30
पतीची नसबंदी फेल झाली आणि त्यामुळे पत्नी गर्भवती झाली. आता हॉस्पिटलने मुलाच्या संगोपनाचा खर्च द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका कपलने हॉस्पिटल विरोधात खटला दाखल केला आहे. या कपलचं म्हणणं आहे की, पतीची नसबंदी फेल झाली आणि त्यामुळे पत्नी गर्भवती झाली. आता हॉस्पिटलने मुलाच्या संगोपनाचा खर्च द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
स्टीवन आणि मेगन असं या कपलचं नाव आहे. त्यांनी २०१८ मध्ये नसबंदी केली होती. ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या नर्सने त्यांना सांगितलं की, नसबंदीचं ऑपरेशन यशस्वी झालं. पण मेगनला २०२३ मध्ये ती गर्भवती असल्याचं समजलं आणि जेव्हा तिला समजलं की, तेव्हा ती १५ आठवड्यांची गर्भवती होती. ज्यामुळे या कपलला धक्का बसला. कारण त्यांना आधीच तीन मुले होतील. ज्यांचा ते सांभाळ करत आहेत.
कपलचा आरोप आहे की, हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणा मुळे त्यांनी या स्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी कोर्टात असा दावा केली की, नसबंदीचा रिपोर्ट चुकीचा होता आणि नर्सने त्यांना चुकीची माहिती दिली. या प्रकरणात नर्सची चुकी मान्य करण्यात आली आहे, मात्र ती आता जिवंत नाही.
कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात कपलने आता बाळाच्या संगोपनासाठी खर्चाची मागणी केली आहे. त्यांनी या स्थितीसाठी हॉस्पिटलला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई पाहिजे. कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली आहे.
या घटनेची सोशल मीडियावरही चांगली चर्चा सुरू आहे. लोक या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक कपलच्या बाजूने आहेत आणि त्यांचं मत आहे की, हॉस्पिटलने कपलला नुकसान भरपाई द्यायला हवी. तर काही लोक ही घटना दुर्देवी मानत आहे.