काय सांगता! जुळ्या बाळांना जन्म दिल्यावर महिला म्हणाली - तिला माहीत नव्हतं ती गर्भवती होती..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:02 PM2021-04-28T12:02:35+5:302021-04-28T12:03:20+5:30
एनी टूपो म्हणाली की, सहा महिन्यांनंतर तिला वाटलं की, पोटात काहीतरी गडबड सुरू आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला.
ही बातमी वाचल्या तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? म्हणजे महिला जुळ्या बाळांना जन्म देते तिला हे माहितही नव्हतं की, ती गर्भवती आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने जे सांगितलं ते खरंच डोकं चक्रावून सोडणारं आहे. दोन बाळांना जन्म दिल्यानंतर ती म्हणाली की, ती गर्भवती असल्याचं तिलाच माहीत नव्हतं. एनी टूपो म्हणाली की, सहा महिन्यांनंतर तिला वाटलं की, पोटात काहीतरी गडबड सुरू आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तिला धक्का बसला. ती सहा महिन्यांची गर्भवती होती.
मॅकक्रेमध्ये राहणारी एनीने फेसबुकवर महिलांसंबंधी एका ग्रुपमध्ये आपला अनुभव शेअर केला. जेव्हा ती मेडिकल चेकअपसाठी गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. हे तिच्यासाठी धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. कारण तिच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा विशेष बदल झाला नव्हता. तिचा पती रसेल यालाही प्रश्न पडला होता. (हे पण वाचा : हसू आल्यावर आपोआप बेशुद्ध पडते ही महिला, दोन दुर्मीळ आजारामुळे झाली हैराण!)
एनीने सांगितले की, 'मला कधीच चक्कर आली नाही. फक्त कधी कधी थकल्यासारखं वाटत होतं. तिने पोस्टमध्ये लिहिले की, गेल्याच आठवड्यात मी आपल्या यूट्यूब बाळाला बांधण्याबाबत पोस्ट केली होती. कारण मला एक आठवड्यांपूर्वीच समजलं होतं की, मी गर्भवती आहे. तिला काही दिवसांपूर्वीच समजलं होतं की, तिच्या पोटात जुळे बाळ आहेत.
एनी २५ एप्रिलला सकाळी ३ वाजता वॉशरूमला गेली होती. पण तिला लगेच जाणीव झाली की, तिला त्रास होतो आहे. ती म्हणाली की, मी खाली पोहोचले आणि माझ्या मुलीचं अर्ध डोकं बाहेर होतं. मला काही सुचत नव्हतं. माझा पती सिडनीमध्ये कामासाठी गेला होता. मला टॉवेल आणि चादर घेतली. त्यानंतर तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर मेड्स पोहोचली. तेव्हा ते आई आणि बाळांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.