फक्त एक डास चावल्यामुळे व्यक्तीवर केले गेले 30 ऑपरेशन, इतकंच काय तर तो कोमातही गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 09:26 AM2022-11-28T09:26:56+5:302022-11-28T09:27:37+5:30
Mosquito Bite Man In Coma: जर्मनीतून एक वेगळीच घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. एक डास चालवल्यामुळे एका व्यक्तीचे 30 ऑपरेशन करावे लागले.
Mosquito Bite Man In Coma: भारतात सध्या अनेक शहरांमध्ये डेंग्यूने थैमान घातलं आहे. यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. डास चावल्याने होणाऱ्या या आजारावर डॉक्टरांकडून वेगवेगळे उपाय सांगितले जातात. अशात जर्मनीतून एक वेगळीच घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. एक डास चालवल्यामुळे एका व्यक्तीचे 30 ऑपरेशन करावे लागले.
ही घटना जर्मनीच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीच्या मांडीवर त्याला हा डास चावला होता. यानंतर त्याला समस्या जाणवली तर तो डॉक्टरांकडे गेला. पण हळूहळू इन्फेक्शन पसरू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. नंतर डॉक्टरांना दिसून आलं की, यामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्या होऊ लागल्या आहेत.
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर रूग्णाचं इन्फेक्शन इतकं पसरलं की, त्याचं लिव्हर, किडनी, हार्ट आणि फुप्फुसांनी काम करणं बंद केलं. यानंतर त्याच्या मांडीजवळ ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टरांना वाटलं की, ऑपरेशन केल्यावर स्थिती नॉर्मल होईल. पण काही झालं नाही आणि इन्फेक्शन अधिक जास्त वाढलं. त्यानंतर मांडीवर अनेक प्रकारच्या त्वचेसंबंधी गोष्टी ट्रांसप्लांट कराव्या लागल्या.
एकूणच काय तर या व्यक्तीवर लहान-मोठे 30 ऑपरेशन करण्यात आले. तो कोमात गेला होता. या व्यक्तीला डास काही महिन्याआधी चावला होता. पण जेव्हा तो नुकताच कोमात गेला तेव्हा त्याची कहाणी व्हायरल झाली. असं सांगितलं जात आहे की, व्यक्तीला एशियन टायगर प्रजातीचा डास चावला होता. हा सगळ्यात खतरनाक डास असतो.