या माशांना पाहिल्यानंतर मासे खाणेच विसराल..
By Admin | Published: May 4, 2017 01:07 AM2017-05-04T01:07:58+5:302017-05-04T01:07:58+5:30
मासे दिसायला आकर्षक असतात, तसेच त्यांची चवही स्वादिष्ट असते. त्यामुळेच मांसाहारी लोक आवडीने मासे खातात. माशांचे
सिडनी : मासे दिसायला आकर्षक असतात, तसेच त्यांची चवही स्वादिष्ट असते. त्यामुळेच मांसाहारी लोक आवडीने मासे खातात. माशांचे सेवन केल्यामुळे शरीराला सर्व प्रकारचे पोषण मिळते. त्यामुळे डॉक्टरही मासे खाण्याचा सल्ला देतात; मात्र काही मासे असे आहेत ज्यांना पाहिल्यानंतर तुम्ही मासे खाणे तर सोडा त्यांना पाहणेही सोडाल.
फंगटुश फिश
या माशाचे नाव फंगटुश फिश असून, महासागरातील सर्वात लांब दाताचा मासा म्हणूनही तो ओळखला जातो. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ रात्रीच शिकार करतो.
ग्रिनेडियर फिश
हे मासे समुद्रात अधिक प्रमाणात आढळून येतात. या माशाचे डोळे एवढे बटबटीत आहेत की, त्यांच्याकडे पाहावलेही जात नाही; मात्र भक्ष्य पकडण्यासाठी या डोळ्यांची खूप मदतहोते.
स्कॅबर्ड फिश
काळ्या रंगाच्या या माशाचे रूप बटबटीत आहे. हा मासा चपळ असून, विद्युत वेगाने शिकार करतो. दुसऱ्या माशाचे भक्ष्य होऊ नये म्हणून रंग बदलण्याचे कसबही त्याच्याकडे आहे. अत्यंत टोकदार दात असलेला हा मासा अटलांटिक महासागरात आढळतो.
सिटोर्हिनस
मॅक्सिमस
या माशाचे नाव ‘सिटोर्हिनस मॅक्सिमस’ आहे. व्हेल शार्कनंतरचा हा जगातील दुसरा सर्वात मोठा मासा आहे. हा मासा खोल पाण्यात राहतो. हा मासाही कुरूप आहे.
मोंकफिश
हा मासा उत्तरेकडील समुद्रात आढळून येतो. त्याचे नाव मोंकफिश असून, शिकार पकडण्यासाठी तो आपला जबडा गरजेप्रमाणे बदलतो. हा मासाही दिसायला विद्रूप आहे.
सी स्पायडर
हा मासा दक्षिण सागरी किनारा आणि अटलांटिक महासागरात आढळून येतो. ‘सी स्पायडर’ असे या माशाचे नाव असून, त्याचे डोळे मोठे आणि बटबटीत असतात. त्यांच्या डोळ्यात प्रकाश शोषण्याची विशेष क्षमता असते.