अवकाशात तब्बल एक वर्ष घालवल्यानंतर स्कॉट केली पृथ्वीवर परतला

By Admin | Published: March 2, 2016 11:52 AM2016-03-02T11:52:33+5:302016-03-02T12:30:56+5:30

अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली आणि रशियन सहकारी मिखाईल क्रोनीइन्को यांनी अवकाशात तब्ब्ल एक वर्ष घालवल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत

After spending a year in the sky, Scott returned to the earth | अवकाशात तब्बल एक वर्ष घालवल्यानंतर स्कॉट केली पृथ्वीवर परतला

अवकाशात तब्बल एक वर्ष घालवल्यानंतर स्कॉट केली पृथ्वीवर परतला

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत -
कझाकस्तान, दि. २ - अमेरिकन अंतराळवीर स्कॉट केली आणि  रशियन सहकारी मिखाईल क्रोनीइन्को यांनी अवकाशात तब्ब्ल एक वर्ष घालवल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर परतले आहेत. स्कॉट केली आणि  मिखाईल क्रोनीइन्को यांनी अवकाशात ३४० दिवस मुक्काम केला. एक वर्षे अंतराळात राहिल्यानंतर मानवाच्या शरीरावर आणि मानसिकतेवर काय परिणाम होतो ? याचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम साकारण्यात आली होती. रशियन मिशन कंट्रोलने स्कॉट केली सहका-यांसोबत पृथ्वीवर लॅडींग करत असल्याची माहिती दिली होती. स्कॉट केलीने सर्वात जास्त दिवस अवकाशात राहण्याचा अमेरिकन अंतराळवीराचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.  नासाने स्कॉट केलीच्या या प्रवासाचा व्हिडिओदेखील ट्विटरवरुन शेअर केला आहे. 
 
स्कॉट केली यांनी आतापर्यंत चार वेळा अवकाशात प्रवास केला आहे. अवकाशात त्यांनी एकूण 520 दिवस मुक्काम केला आहे. जेव्हा स्कॉट केली अवकाशात होते तेव्हा शास्त्रज्ञ पृथ्वीवर त्यांच्या जुळ्या भावावर प्रयोग करत होते. वेगवेगळ्या वातावरणात नेमका शरिरावर काय परिणाम होतो यासाठी हा अभ्यास केला जात होता. दोघांचं जेनेटिक एकच असल्याने याचा शास्त्रज्ञांना खुप फायदा झाला. 
 
मोहिमेतील आव्हाने - 
- स्पेसमध्ये राहताना झोपेची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते 
- वातावरणाचा शरिरावर परिणाम होतो, हाडे ढिसूळ होतात तसंच मेंदूवदेखील परिणाम होतो
- या मोहिमेदरम्यान ७३० लीटर युरिन पिण्यात आलं
- स्कॉट केली यांनी  १४३,८४६,५२५ मैल प्रवास केला
- १०,२६० वेळा सुर्योद्य आणि सुर्यास्त पाहिला
- शरिराचा आकार संतुलित ठेवण्यासाठी ६४० तास ट्रेडमिलवर धावण्याचा सराव
- २० वेळा वैद्यकीय चाचणी करण्यात आली
 

Web Title: After spending a year in the sky, Scott returned to the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.