आता ओळखपत्राशिवाय यूजर्स बघू शकणार नाहीत ऑनलाइन पॉर्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 01:05 PM2019-04-19T13:05:50+5:302019-04-19T13:10:27+5:30

भारतात भाजपा सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चांगलाच वाद झाला होता आणि प्रकरण थंड झालं.

Age verification compulsory for watching online porn in UK from 15th July | आता ओळखपत्राशिवाय यूजर्स बघू शकणार नाहीत ऑनलाइन पॉर्न!

आता ओळखपत्राशिवाय यूजर्स बघू शकणार नाहीत ऑनलाइन पॉर्न!

Next

भारतात भाजपा सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चांगलाच वाद झाला होता आणि प्रकरण थंड झालं. आता पॉर्नोग्राफीसा लगाम घालण्यासाठी पॉर्न वेबसाइट्सवर वयाची खरी माहिती देणे बंधनकारक असणार आहे. असा निर्णय घेणारा ब्रिटन हा जगातला पहिला देश ठरला आहे. वयाची माहिती देण्यासाठी आता आयडी कार्डचे डिटेल्स द्यावे लागतील. म्हणजे केवळ 18+ च्या बॉक्समध्ये क्लिक करुन चालणार नाही. 

Son sues father who destroyed his 20 lakh rupees worth porn film collection | २० लाख रुपयांच्या Porn Collection साठी पिता-पुत्रात भांडण, मुलाने ठोकली केस!

रिपोर्ट्सनुसार, ब्रिटनमध्ये हा नवा कायदा १५ जुलैपासून लागू होणार आहे. ज्यानुसार इंटरनेटवर पॉर्न उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांना त्यांचा कन्टेंट बघणारा यूजर १८ वर्षापेक्षा अधिक असल्याची चौकशी करावी लागणार आहे. कारण या डिजिटल जगात धोकादायक साइट्सपर्यंत लहान मुलांना पोहोचणं सहज शक्य होत आहे. 

(Image Credit : TNW)

या नवा नियम लागू करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइट्सना अनेक तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. जेणेकरुन यूजरचं खरं आणि योग्य वय कळेल. जर कंपन्यांनी असं केलं नाही तर वेबसाइट ब्रिटनच्या यूजरसाठी बंद केली जाईल. ब्रिटनमधील संस्कृती, मीडिया आणि खेळ विभागाने सांगितले की, वेबसाइट्सवर वयाची चौकशी करण्याची प्रक्रिया कठिण ठरेल. कारण केवळ जन्मतारीख लिहिल्याने किंवा एखाद्या बॉक्समध्ये क्लिक करुन ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी यूजरला त्यांचं वय किती हे पटवून देण्यासाठी क्रेडिट कार्ड, पासपोर्ट किंवा डिजिटल आयडीचा वापर करावा लागेल.

रिपोर्ट्सनुसार, ब्रिटन सरकारने हा नियम लागू करण्याआधी लोकांची मते जाणून घेतली. त्यानंतर संसदेत यावर चर्चा झाली, वाद झाले. त्यानंतर हा नियम लागू केला. यासाठी सर्व्हेही करण्यात आला होता. ज्यात ७ ते १७ वयोगटातील लहान मुलांच्या ८८ टक्के आई-वडिलांनी या नियमाला सहमती दर्शवली होती. 

Web Title: Age verification compulsory for watching online porn in UK from 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.