काय सांगता! वृद्ध उंदरांना बनवलं तरूण, जाणून घ्या वैज्ञानिकांनी कशी केली ही कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 02:02 PM2022-05-10T14:02:45+5:302022-05-10T14:03:01+5:30
New Research : ब्रिटिश वैज्ञानिकांनी वृद्ध उंदरांना तरूण बनवण्यासाठी विष्ठेचा वापर केला. हे जरा विचित्र वाटणारं आहे. पण सत्य आहे.
जगभरातील वैज्ञानिक वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. आता वैज्ञानिकांनी यासंबंधी एक प्रयोग केला आहे जो हैराण करणारा आहे. वैज्ञानिकांनी एका वृद्ध उंदराला तरूण केलं आहे. यासाठी त्यांनी तरूण उंदराची विष्ठा वृद्ध उंदरात ट्रान्सप्लांट केली. या रिसर्च दरम्यान तरूण उंदरातून वृद्ध उंदरांमध्ये फीकल मायक्रोब्सला ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ज्याने वृद्ध उंदराच्या आतड्या, डोळे आणि मेंदू तरूण उंदरांसारखा काम करू लागला.
ब्रिटिश वैज्ञानिकांनी वृद्ध उंदरांना तरूण बनवण्यासाठी विष्ठेचा वापर केला. हे जरा विचित्र वाटणारं आहे. पण सत्य आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा उंदरांवर हा प्रयोग केला, तेव्हा त्यांच्या तरूण उंदरांसारखी लक्षणं दिसू लागली. वैज्ञानिकांनी जेव्हा वृद्ध उंदरांमध्ये तरूण उंदरांची विष्ठा ट्रान्सप्लांट केली तेव्हा वृद्ध उंदरांच्या शरीरात फायदेशीर मायक्रोब्स म्हणाजे रोगाणु पोहोचले.
ही काही वृद्धाला तरूण बनवण्याची पद्धत नाहीये. पण जसजसं मनुष्याचं वय वाढत जातं शरीर कमजोर होऊ लागतं आणि आतड्याही आधीसारखं काम करत नाहीत. पण यातून हे नक्की स्पष्ट झालं की, जर आतड्या मजबूत राहिल्या तर जास्त काळासाठी मनुष्याची शारीरिक क्षमता मजबूत राहते. सध्या हा प्रयोग केवळ उंदरांवर करण्यात आला आहे.
हा रिसर्च मायक्रोबायोममध्ये प्रकाशित करण्यात आला. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, ही टेस्ट करण्यात आली की, आतड्यांमध्ये मायक्रोबायोटामध्ये हेर-फेर केला तर वयासंबंधी आजार वाढण्यावर प्रभाव पडतो.
जेव्हा वैज्ञानिकांनी तरूण उंदरांची विष्ठेतील रोगाणुंना वृद्ध उंदरांमध्ये ट्रान्सप्लांट केले याने त्यांच्यातील सूज कमी झाली. यानंतर हा प्रयोग उलटा करण्यात आला म्हणजे वृद्ध उंदरांतील विष्ठेतील रोगाणु तरूण उंदरांमध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आले. तेव्हा तरूण उंदरांच्या आतड्यांवर जास्त सूज येऊ लागली.
या लक्षणांमध्ये आतड्यांच्या थरावर प्रभाव पडताना दिसला. याने बॅक्टेरिया रक्तात पोहोचू शकतात. रेटिनल डिजनरेशनसंबंधी प्रोटीन उच्च स्तरावर पोहोचले. तर रोगप्रतिकारक कोशिकाही जास्त सक्रिय झाल्या. वैज्ञानिकांना हे सांगायचं आहे की, आतड्यांचा मनुष्याच्या आरोग्याशी मोठा संबंध आहे. मग ते मानसिक आरोग्य किंवा शारीरिक.