संन्यासी पतीने पत्नीची शारीरिक सुखाची मागणी धुडकावली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:36 PM2020-01-09T12:36:30+5:302020-01-09T12:39:25+5:30

पतीने पत्नीची शारीरिक सुखाची मागणी पूर्ण न करता तिलाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ahmadabad woman demand sex celibate husband, Thrashed by in-laws | संन्यासी पतीने पत्नीची शारीरिक सुखाची मागणी धुडकावली आणि मग...

संन्यासी पतीने पत्नीची शारीरिक सुखाची मागणी धुडकावली आणि मग...

googlenewsNext

(Image Credit : pennmedicine.org) (सांकेतिक फोटो)

पतीने पत्नीची शारीरिक सुखाची मागणी पूर्ण न करता तिलाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही घटना घडली असून पती आणि त्याच्या परिवारातील सदस्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्यापही कोणाला अटक केलेली नाहीये.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २२ वर्षीय पत्नीने तक्रारीत सांगितले की, 'आधी पती चांगला वागत होता. २०१८ मध्ये आम्हाला एक मुलगा झाला, पण त्यानंतर पतीचं वागणं अचानक बदललं'. पीडित महिला ही दनिलिम्डा येथील राहणारी असून तिचं लग्न सरखेज येथे राहणाऱ्या तरुणासोबत २०१६ साली झालं. 

गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्याने आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास बंद केल्याचा दावा पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. तिने सांगितले की, "जेव्हा कधी मी पतीकडे शारीरिक सुखाची मागणी केली, तेव्हा तो माझ्यावर ओरडायचा, शिवीगाळ करायचा आणि मारहाण करायचा. आता त्याने दावा केला आहे की त्याने संन्सास घेतला आहे".

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेने सतत आपल्या पतीकडे शारीरिक सुखाची मागणीचा केल्यावर तिचा पती घरातून निघून गेला. पीडित महिलेने असेही सांगितले की, तिच्या पती कर्ज घेतलं होतं. पण त्याला ते फेडता आलं नाही. इतकेच नाही तर मुलगा आजारी असताना त्याने एका पैशाचीही मदत केली नाही.


Web Title: Ahmadabad woman demand sex celibate husband, Thrashed by in-laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.