धक्कादायक! महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, नट-बोल्ट; डॉक्टरही हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:51 PM2018-11-14T12:51:51+5:302018-11-14T12:52:09+5:30
तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही बातमी तितकीच धक्कादायक पण खरी आहे.
(Image Credit : Khaleej Times)
तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही बातमी तितकीच धक्कादायक पण खरी आहे. मानसिक आजारी लोक कधी काय करतील याचा काहीच नेम नसतो, याचा अनेकदा अनुभव तुम्हाला आला असेल किंवा तुम्ही पाहिलं असेल. असाच एका महिलेचा धक्कादायक कारनामा समोर आला आहे. एक महिला तिच्या पोटाचा वापर हार्डवेअर स्टोर आणि ज्वेलरी शॉपसारखा करत होती.
ऑपरेशननंतर या महिलेच्या पोटातून एक इंचाचे लोखंडाचे खिळे, नट-बोल्ट, सेफ्टी पीन, यू-पीन, हेअर पीन, बांगड्या, चेन्स, मंगळसूत्र आणि अंगठी या वस्तू काढण्यात आल्या. या सर्व वस्तूंचं वजन दीड किलो इतकं भरलं आहे. हे सर्व खाणारी महिला ही मानसिक रुग्ण आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ४० वर्षीय संगीता या महिलेला पोटात दुखत असल्याने ३१ ऑक्टोबरला मानसिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या महिलेचं मानसिक आरोग्य ठिक नसून ती अहमदाबाद शहरातील शाहेरकोटडा परिसरातील रस्त्यांवर फिरत असे.
डॉक्टरांनी सांगितले की, 'महिलेचं पोट दगडाप्रमाणे कडक झालं होतं. एक्सरे काढला तेव्हा तिच्या पोटात एक मोठी गाठ दिसत होती. त्यासोबतच तिच्या फुफ्फुसांना सेफ्टी पीन्स चिकटलेल्या होत्या. इतकेच नाही तर एका पीनमुळे तिच्या पोटाला छिद्रही पडलं होतं. त्यामुळे आम्ही तिचं वेळीच ऑपरेशन केलं. तेव्हा तिच्या पोटातून निघालेल्या वस्तू पाहून डॉक्टरही हैराण झाले.
ऑपरेशन दरम्यान तिच्या पोटातून धातूपासून बनलेल्या वस्तू, ज्वेलरी, धागे आणि चेन मिळाल्या. यांचं एकूण वजन दीड किलो होतं.