अनोळखी भारतीय पुरुषांसोबत बिनधास्त डेटवर जाते ही ब्रिटिश महिला, वरुन पैसेही घेते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:27 PM2022-03-29T18:27:39+5:302022-03-29T18:31:48+5:30
ब्रिटनमधून भारतात आलेल्या एली सेघेटी (Aili Seghetti) या कन्झ्युमर रिसर्चर आणि इंटिमसी कोचच्या लक्षात आली. भारतात आल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा डेटवर गेली तेव्हा तिला फारसा चांगला अनुभव आला नाही. आपल्या अनुभवाला अनुसरून एलीनं इंटिमसी क्युरेटर (Intimacy Curator) नावाची सर्व्हिस सुरू केली.
भारतामध्ये आजही रिलेशनशिप, इंटिमसी या बाबतीत जाहीरपणे फारसं बोललं जात नाही. इथल्या तरुणाईच्या रिलेशनशिपसंबंधीच्या विचारसरणीमध्येही याचं प्रतिबिंब ठळकपणे दिसतं. भारतीय मुला-मुलींना डेटिंग (Dating) करण्यात आणि संवाद साधताना अडचणी येतात. व्यक्तीशी जवळीक वाढवण्यासाठी कोणाशी कसा संपर्क साधावा, कसं बोलावं याचं जनरल नॉलेजही अनेकांकडे नाही. ही गोष्ट 15 वर्षांपूर्वी ब्रिटनमधून भारतात आलेल्या एली सेघेटी (Aili Seghetti) या कन्झ्युमर रिसर्चर आणि इंटिमसी कोचच्या लक्षात आली. भारतात आल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा डेटवर गेली तेव्हा तिला फारसा चांगला अनुभव आला नाही. आपल्या अनुभवाला अनुसरून एलीनं इंटिमसी क्युरेटर (Intimacy Curator) नावाची सर्व्हिस सुरू केली.
एलीनं भारतामध्ये 'इंटिमसी क्युरेटर' नावानं डेटिंग, रिलेशनशिप, इंटिमसी कोचिंग सर्व्हिस सुरू केली आहे. या सर्व्हिसमध्ये ती क्लायंट्सना डेटिंगशी संबंधित अनुभव शेअर करते. 'डेटिंग सरोगेट' (Dating Surrogate) या ऑप्शनमध्ये एली क्लायंट्सना त्यांच्या डेटशी संबंधित लाइव्ह फीडबॅकही देते. बॉडी लँग्वेज (Body Language), आय कॉन्टॅक्ट, ग्रूमिंग, स्टायलिंग याबाबत ती सल्ले देते. त्याचबरोबर डेटदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा व्हायला हवी, हेही ती सांगते. स्वतःच्या खराब डेटिंग अनुभवानंतरच डेटिंग शिकवण्याची कल्पना तिच्या मनात आली होती. त्यासाठी ती स्वतःच अनेक पुरुषांसोबत डेटवर जाते. तिनं 'डेटिंग सरोगसी' सर्व्हिस देण्यास सुरुवात केली. तिच्याकडे सध्या यासाठी अनेक ट्रेनर्सही आहेत. हे ट्रेनर्स क्लायंट्सना डेटिंगसाठी तयार करतात.
एलीने यापूर्वी बंबल (Bumble), टिंडर (Tinder) आणि फेसबुकसारख्या (Facebook) अनेक कंपन्यांसाठी कन्झ्युमर रिसर्चचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर तिनं सेक्स आणि इंटिमसी कोच (Intimacy Coach) म्हणूनही अनेकांना प्रशिक्षण दिलं आहे. तिच्या मते, कल्चरल शिफ्टमुळे भारतात डेटिंगचा ट्रेंड (Dating Trend) वेगळा आहे. 'द व्हाइस'शी बोलताना एली म्हणाली, 'डेटिंग करताना पुरुष आणि महिलांना कसं बोलावं हे लवकर समजत नाही. याची अनेक कारणं आहेत. आता पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक कमावत असल्यानं त्या उघडपणे सेक्सबद्दल (Sex) बोलतात. आता अरेंज मॅरेजऐवजी (Arrange Marriage) लव्ह मॅरेज (Love Marriage) करण्यालाही तरुण प्राधान्य देत आहेत.'
एलीनं सांगितलं, की क्लायंटसोबतचं तिचं सेशन काउन्सिलिंगपासून सुरू होतं. या माध्यमातून ती त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करते. क्लायंटला कशाची भीती वाटते किंवा त्याला काय अपेक्षित आहे. ती व्यक्ती कॅज्युअल डेटच्या (Casual Date) शोधात आहे की लाँग टर्म पार्टनरच्या (Long Term Partner) शोधात आहे, हेदेखील समजून घेण्याचा प्रयत्न एली करते. यानंतर ती क्लायंटची पर्सनॅलिटी टेस्ट करते.
या माहितीनुसार ती डेटिंग अॅपवर प्रोफाइल तयार करते किंवा त्यासाठी गाइड करते. यानंतर, एली क्लायंटच्या पसंतीनुसार डेट डिझाइन करते. ती म्हणते, की एखाद्याला वाचनाची आवड असेल तर ती त्याच्यासाठी पुस्तकांच्या दुकानात किंवा कॉफी शॉपमध्ये डेट प्लॅन करून देते. एखाद्याला बाहेर डेटवर जायचं असेल तर ती त्याला लोणावळ्यासारख्या जवळच्या हिल स्टेशनवर (Hill Station) घेऊन जाते. क्लायंटला एक आठवडा ते तीन महिन्यांपर्यंतच्या काळात डेटिंग सरोगसीचा एक्सपीरियन्स घेता येतो. याचे काही क्रॅश कोर्सदेखील उपलब्ध आहेत. क्लायंटच्या प्री-डेट काउन्सिलिंगसाठी (Pre-date counseling) तीन हजार रुपये आणि दोन तासांच्या डेटसाठी पाच हजार रुपये द्यावे लागतात. त्याचबरोबर सरोगेटच्या सुरक्षेसाठी एक वकीलही त्याच्यासोबत असतो. जेणेकरून काही कायदेशीर अडचण आल्यास तो हस्तक्षेप करू शकेल. आउटस्टेशन डेटसाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि एलीच्या टीममधल्या इतर व्यक्तीही उपस्थित असतात.
एलीनं सांगितलं, की आम्ही ज्या क्लायंटना रोमान्स करायला शिकवलं तेच आमच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; मात्र आम्ही कधीच पर्सनल इमोशन्स बिझनेसमध्ये आणत नाही. एलीनं हेदेखील स्पष्ट केलं, की तिला अनेकदा डेटवर असतानाच नकाराचाही सामना करावा लागलेला आहे.