सफाई कर्मचाऱ्याला मिळाली पैशांनी भरलेली बॅग, उघडून पाहिली तर झाला अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:46 PM2021-06-17T17:46:52+5:302021-06-17T17:48:37+5:30
विमानतळाकडून जारी पत्रकात सांगण्यात आलं की, विमानतळावर कार्यरत जेकी चावडाला सुरक्षा केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या ट्रे च्या साफ सफाईचं काम दिलं गेलं होतं.
गुजरातच्या अहमदाबाद शहरातील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सफाई कर्मचाऱ्याला ७५० डॉलर इतकी रक्कम भरलेली बॅग सापडली. त्याने प्रामाणिकपणा आणि सतर्कता दाखवत ही बॅग केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या मदतीने मालकाकडे परत केली. या कर्मचाऱ्याचं सर्वांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे.
विमानतळाकडून जारी पत्रकात सांगण्यात आलं की, विमानतळावर कार्यरत जेकी चावडाला सुरक्षा केंद्रावर वापरण्यात येणाऱ्या ट्रे च्या साफ सफाईचं काम दिलं गेलं होतं. यादरम्यान जेकीला बुधवारी सायंकाळी प्लास्टिक बॅगमध्ये ७५० डॉलर ठेवलेली बॅग सापडली.
पत्रकात सांगण्यात आलं की, चावडाला वाटलं की, विमानतळावर औपचारिक बाबी करताना कुणीतरी आपली ही बॅग विसरलं असेल. त्यानंतर त्याने ही बॅग लगेच एका सीआयएसएफ अधिकाऱ्याकडे सोपवली. पत्रकात म्हटलं आहे की, अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून बॅगच्या मालकाचा शोध घेतला. तो त्याची ही बॅग विसरून गेला होता. दरम्यान जेकी चावडाच्या प्रामाणिकपणाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.