या देशातील लोक सगळ्यात जास्त पितात दारू, जाणून घ्या भारताचा नंबर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 01:15 PM2023-11-09T13:15:42+5:302023-11-09T13:20:27+5:30
जर तुम्हाला वाटत असेल की, भारत, अमेरिका किंवा ब्रिटन या पुढे आहेत तर तुम्ही चुकीचे आहात.
दारू पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही लोक दारू पिणं काही सोडत नाही. काही रोज पितात तर काही अधूनमधून. दारू पिण्याचं प्रत्येकांचं आपलं कारण असतं. कुणी दु:खात दारू पितं तर कुणी आनंदात. नुकताच एक रिसर्च करण्यात आला ज्यातून खुलासा झाला की, कोणत्या देशात लोक सगळ्यात जास्त दारू पितात. जर तुम्हाला वाटत असेल की, भारत, अमेरिका किंवा ब्रिटन या पुढे आहेत तर तुम्ही चुकीचे आहात.
परदेशात तुम्ही लोकांना अनेकदा काहीही खाताना दारू पिताना पाहिलं असेल. अशात लोकांना वाटतं की, अमेरिका किंवा इंग्लंडसारख्या देशांमध्ये लोक सगळ्यात जास्त दारू पित असतील. पण तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. याबाबतीत असा एक देश पुढे आहे ज्याची तुम्ही विचारही केला नसेल. दारू पिण्याच्या बाबतीत डेनमार्कमधील लोक सगळ्यात पुढे आहेत. येथील लोक सगळ्यात जास्त दारू पितात.
जसं या लिस्टमध्ये सगळ्यात दारू पिणाऱ्या देशाचं नाव समोर आलं, तसंच ज्या देशातील लोक दारू कमी पितात त्या देशांचीही नावे समोर आली. तुर्कीमध्ये केवळ 3 टक्के लोक दारूचं सेवन करतात. हा सर्वे तेव्हा करण्यात आला जेव्हा ब्रिटनमध्ये लोकांतील अल्कोहोलचं कंजम्प्शन वाढलं होतं. तुमच्यासाठी आनंदाची ही बाब आहे की, भारत या लिस्टमध्ये बराच खाली आहे. तुर्की आणि इंडोनेशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात ग्रामीण भागांमध्ये दारूचं सेवन जास्त केलं जातं. तेच सिगारेट पिण्यात यूके फार मागे आहे.