लॉटरीचे 2 कोटी रुपये घ्यायला गेला अन् दुसऱ्या देशात अडकला, वाचा नेमकं काय आहे प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 10:49 AM2022-04-17T10:49:05+5:302022-04-17T11:07:11+5:30
लॉटरीचे पैसे मिळवण्यासाटी दोन मित्रांना पाठवले, त्यांनाही पोलिसांनी अटक केले.
तुम्ही लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यात तुम्ही कोट्यवधी रुपये जिंकले, पण काही कारणास्तव तुम्हाला पैसे मिळाले नाही तर? अशावेळी तुमची अवस्था काय असेल? अशीच एक घटना अल्जेरियातील एका व्यक्तीसोबत घडली आहे. त्या व्यक्तीने एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यात त्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पण, पैसे मिळू शकले नाहीत...
...यामुळे पैसे मिळाले नाही
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अल्जेरियातील एका व्यक्तीशी संबंधित आहे. त्याने बेल्जियममध्ये एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्या लॉटरीत त्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पण, त्याला लॉटरी कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. या नकाराचे कारण म्हणजे, त्या व्यक्तीचा बेल्जियममध्ये कायमचा पत्ता नाही. तसेच, त्याचे बेल्जियममध्ये बँक खातेही नाही. त्यामुळेच कंपनीने पैसे देण्यास नकार दिला.
दोन मित्र पोलिसांच्या ताब्यात
पुरस्काराची रक्कम मोठी असल्यामुळे ती रोख स्वरूपात दिली जाऊ शकत नाही. यासाठी कंपनीने त्याला बँक खाते मागितली होते. दरम्यान, त्या व्यक्तीच्या बेल्जियममधील दोन मित्रांनी त्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. पण चोरीच्या संशयावरुन पोलिसांनी त्या दोघांना तुरुंगात टाकले. नंतर सर्व माहिती समजल्यावर त्यांची सुटकाही करण्यात आली.
लॉटरीचा वाद न्यायालयात
आता हे लॉटरीचे तिकीट कोर्टात जमा झाले आहे. बेल्जियमच्या मीडियानुसार, अल्जेरियन व्यक्तीने 4 महिन्यांपूर्वी आपला देश सोडला होता. तो बोटीने स्पेनला पोहोचला, त्यानंतर तो स्पेनहून फ्रान्समार्गे पायी चालत बेल्जियमला पोहोचला. त्या व्यक्तीचे वकील अलेक्झांडर व्हर्स्ट्रेट म्हणाले की, बँक खाते नसल्यामुळे लॉटरी कंपनी पैसे देण्यास नकार देत आहे. आता यावर कोर्टात सुनावणी होणार आहे.