'ही' आजीबाई आहे जगातील सर्वाधिक वयाची मॉडल; फोटो पाहून बसणार नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 02:58 PM2019-09-20T14:58:02+5:302019-09-20T15:03:03+5:30
वय मोठं असलं तरिही मन तरूण असणं गरजेचं असतं, असं म्हणतात ना तेच खरं. अनेक लोक म्हणतात की, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की समजा तुम्ही म्हातारे झालात.
वय मोठं असलं तरिही मन तरूण असणं गरजेचं असतं, असं म्हणतात ना तेच खरं. अनेक लोक म्हणतात की, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या की समजा तुम्ही म्हातारे झालात. सुरकुत्या म्हणजे वाढत्या वयाचं लक्षणं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण याच सुरकुत्यांच्या जोरावर 96 वर्षांच्या आजीबाईंनी सौंदर्याची नवीन व्याख्या सर्वांसमोर मांडली आहे. एलिस नावाच्या या आजीबाई आपल्या सुरकुत्या असलेल्या चेहऱ्यासोबत आत्मविश्वासाने रॅम्पवर मॉडलिंग किंवा फोटोशूट करताना दिसतात. त्यांच्या सौंदर्यासाठीच नाहीतर त्यांच्या वयामुळेही त्यांना संपूर्ण जगातील मॉडलिंग विश्वातील वयोवृद्ध मॉडला किताब देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. याआधी जपानमधील नाओया कुडो आणि चीनमधील वांग डेशन हे सर्वात जास्त वयाचे मॉडल्स होते.
नातीमुळे मिळाली प्रेरणा
हॉन्गकॉन्गमध्ये पाहणारी 96 वर्षांच्या एलिस यांना आधीपासूनच फॅन्सी आणि क्लासी ड्रेस वेअर करण्याची आवड होती. परंतु, त्यांनी कधी विचारही केला नव्हता की, पुढे जाऊन मॉडलिंग करतील.
मॉडलिंग विश्वात पदार्पण करण्याचं श्रेय एलिस आपल्या नातीला देतात. तिने एक जाहिरात पाहून आपल्या आजीचे फोटो पाठविले होते. त्यातून एलिसची निवड झाली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
वय नाहीतर कामामुळे लोकांना आपवडतात एलिस
आपल्या करिअरमध्ये पुढे जात असतानाच एलिस यांना अनेक कठिण समस्यांचा सामना करावा लागला होता. परंतु, एलिस यांनी कधीही हार मानली नाही. कदाचित यामुळेच लोकांना त्यांचं काम आवडत असेल. या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक नवीन गोष्टी शिकल्या.
जसं-जसं त्यांचे मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर आणि मॅनेजर्सनी त्यांची मदत केली तसतशी त्यांना या क्षेत्राची आवड निर्माण झाली. गुच्ची, वेलेंटिनो, एलेरी यांसारख्या अमेक मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँड्ससाठी एलिस मॉडलिंग करतात. त्यांचं काम पाहून अनेक लोक त्यांना त्यांच्या फिटनेसचं राजही विचारतात.
टिका करण्याऱ्यांमुळेच मिळते हिम्मत
आजीबाईंचे मॅनेजर आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांना वाटतं की, आजी फिट अन् फाइन राहण्यासाठी दररोज एक्सरसाइज आणि डाएट फॉलो करत असेल. परंतु, असं अजिबात नाही.
वयाच्या 90व्या वर्षी करिअरला सुरुवात केल्यामुळे काही लोक त्यांना आपलं इस्पिरेशन मानतात. तर काही लोक त्यांच्यावर टिकाही करतात. एवढचं नाहीतर टिका करणारे त्यांना म्हणतात की, त्यांनी त्यांच्या वयाचे कपडे वेअर केले पाहिजे. यासर्व गोष्टींचा त्या स्वतःवर आणि कामावर कोणताही परिणाम होऊ देत नाहीत. त्या सांगतात की, अशा टिकांमुळे मला आणखी जोमाने काम करण्यासाठी हिम्मत मिळते.