अजब दावा - पृथ्वीवर आली होती एलिअन महिला, या व्यक्तीसोबत ठेवले संबंध; देणार हायब्रीड बाळाला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 02:22 PM2023-06-02T14:22:19+5:302023-06-02T14:28:22+5:30

Weird Claim about Aliens : ही घटना 1994 मधील आहे. मेंग नावाची ही व्यक्ती घरात झोपली होती तेव्हाच त्याने शहरात एका डोंगरावर चकमकीत प्रकाश असलेली वस्तू पाहिली.

Alien got pregnant after physical relation with human Chinese man weird claims | अजब दावा - पृथ्वीवर आली होती एलिअन महिला, या व्यक्तीसोबत ठेवले संबंध; देणार हायब्रीड बाळाला जन्म!

अजब दावा - पृथ्वीवर आली होती एलिअन महिला, या व्यक्तीसोबत ठेवले संबंध; देणार हायब्रीड बाळाला जन्म!

googlenewsNext

Weird Claim about Aliens : एलिअन्सच्या अस्तित्वाबाबत जगभरातील लोक वेगवेगळा दावा करत असतात. अशातच चीनच्या एका व्यक्तीने अजब दावा करून खळबळ उडवली आहे. त्याचं म्हणणं आहे की, काही वर्षाआधी एक एलिअन महिला पृथ्वीवर मनुष्यांना बघण्यासाठी आली होती. तिने त्याचं अपहरण केलं होतं आणि हवेतच त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवले. ज्यामुळे एलिअम महिला प्रेग्‍नेंट झाली. आता ती एलिअन महिला  हायब्रीड बाळाला जन्म देणार आहे. आता तो त्या मुलाची वाट बघत आहे. या दाव्यामुळे वैज्ञानिकांचं डोकं चक्रावलं आहे.

ही घटना 1994 मधील आहे. मेंग नावाची ही व्यक्ती घरात झोपली होती तेव्हाच त्याने शहरात एका डोंगरावर चकमकीत प्रकाश असलेली वस्तू पाहिली. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा हेलिकॉप्टरचा मलबा पडला होता. मेंगने दावा केला होता की, तो बघत होता तेव्हा त्याच्या डोक्यावर एक वस्तू लागली, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. 

द वर्ल्ड ऑफ चायनीजच्या रिपोर्टनुसार, मेंगसोबत त्याच्या पुतिनाचा पतीही होता. दोघांना विजेचा जोरदार झटका लागला आणि बेशुद्ध झाले. जेव्हा मेंगचे डोळे उघडले तर तो त्याच्या घरात होता. त्याला आधीचं काही आठवत नव्हतं. 

मेंगने सांगितलं की, या घटनेनंतर सगळं काही नार्मल झालं. पण एका रात्री अचानक त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला दिसलं की, तो बेडच्या वर हवेत तरंगत आहे. खाली बेडवर त्याची पत्नी झोपली आहे. तेव्हा त्याला एक महिला एलिअन दिसली. एलिअन महिलेने मेंगसोबत हवेतच शारीरिक संबंध ठेवले. साधारण 40 मिनिटे दोघांमध्ये संबंध झाले. त्यानंतर अचानक महिल एलिअन भिंतीतून गायब झाली. मेंगने सांगितलं की, एलिअन जाताच तो बेडवर येऊन पडला.

यानंतर काही दिवसातच त्याचा सामना एलिअनसोबत झाला होता. काही एलिअन आले आणि त्याला उचलून अंतराळात घेऊन गेले. तो तिथे बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांना काही समजत नव्हतं. एलिअन त्याला म्हणाले की, ते रिफ्यूजीसारखे आहेत त्यांना आधीसारखं रहायचं आहे. 

जेव्हा मेंगने महिलेबाबत एलिअन्सना विचारलं की, मी तिला बघू शकतो का? तेव्हा एलिअन्स म्हणाले की, हे अशक्य आहे. 60 वर्षात एका दुसऱ्या ग्रहावर तिचं बाळ जन्माला येईल जो मेंगचा मुलगा असेल. एलिअन्सने कथितपणे मेंगला बृहस्पति ग्रहाला टक्कर मारणाऱ्या एका धुमकेतुचं रेकॉर्डिंग दाखवलं. ही घटना खरंच झाली होती.

मेंग म्हणाला की, एलिअन्स 2016 मध्ये पुन्हा त्याला भेटण्यासाठी आले. यावेळी त्यांनी 1994 मध्ये धुमकेतुच्या टक्करमधून निघालेला एक तुकडा दिला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, मेंगकडे तो तुकडा होता आणि जेव्हा वैज्ञानिकांनी नंतर याचं विश्लेषण केलं तर तो टेरबियम नावाचा एक दुर्मिळ धातु असल्याचं सांगितलं. 

चीनच्या यूएफओ क्लबच्या अनेक वैज्ञानिकांनी पुरावे गोळा करण्यासाठी फीनिक्स माउंटेनचा दौरा केला. जिथे त्यांना झाडी आणि डोंगरांवर काही जळाल्याच्या खुणा दिसल्या. बीजिंग यूएफओ रिसर्च ऑर्गनायझेशनचे पहिले अध्यक्ष वांग फांगचेन यांनी सांगितलं की, वैज्ञानिकांनी मेंगच्या घराची तपासणी केली होती आणि दावा करण्यात आला की, तिथे डिवाइस खराब झालं होतं. चुकीचं रिडींग दाखवत होतं. खासकरून त्या भिंतीचं ज्यातून एलिअन बाहेर गेल्याचा दावा करण्यात आला होता.

Web Title: Alien got pregnant after physical relation with human Chinese man weird claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.