'एलिअन्स येतात आणि गायींचे अवयव कापून नेतात', एका दाम्पत्याचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:18 AM2023-04-04T10:18:48+5:302023-04-04T10:18:56+5:30
Aliens : एलिअन त्यांच्या गावात येतात आणि गायींना मारून त्यांचे अवयव कापून नेतात. हैराण करणारी बाब ही एक हे सगळं करताना रक्ताचा एक थेंबही तिथे दिसत नाही.
Aliens : एलिअन्स या जगात असण्याबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जातात. कधी म्हटलं जातं की, काही दिवसांमध्येच एलिअन्स आणि मनुष्यांमध्ये युद्ध होईल. एलिअन्स पृथ्वीवर ताबा मिळवतील. तर कधी UFO बघितल्याचाही दावा केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला एलिअन्सबाबत केलेल्या एका अशा दाव्याबाबत सांगणार आहोत जो वाचून तुम्ही हैराण व्हाल. ऑस्ट्रेलियामधील काही डेअरी फार्म मालकांचा दावा आहे की, एलिअन त्यांच्या गावात येतात आणि गायींना मारून त्यांचे अवयव कापून नेतात. हैराण करणारी बाब ही एक हे सगळं करताना रक्ताचा एक थेंबही तिथे दिसत नाही.
क्वींसलॅडच्या ग्राज़ियर्स जूडी आणि मिक कुक गेल्या 18 वर्षापासून डेअरी फार्म चावतात. साधारण 14,600 हेक्टर जमिनीवर ते गायी पाळतात आणि त्यांच्याकड 1100 पेक्षा जास्त गायी आहेत. मिक कुक म्हणाले की, इथे गेल्या अनेक वर्षापासून एलिअन येतात आणि गायींना मारतात. त्यांचे स्तन, गाल आणि जीभ कापून घेऊन जातात. इतकंच नाही तर गायींचे मृतदेह शेतात फेकून पळून जातात. अनेक वर्षापासून हेच चालत येत आहे.
कुक म्हणले की, हे कसं होऊ शकतं की, नाक, स्तन, गाल आणि जीभ कापून नेतात आणि रक्ताचा एक थेंबही पडत नाही. जर एखाद्या जंगली प्राण्याने गायींवर हल्ला केला तर त्यांच्या पंजाच्या खुणा दिसायला पाहिजे. गायी भूकेने मरत नाहीत, कारण खाण्यासाठी भरपूर आहे. आणि मग इतक्या सफाईने गायींची सर्जरी केली जाते की, बघून हैराण व्हायला होतं. या अवयवांचा मनुष्याला काही फायदा नाही. दाम्पत्याचा असाही दावा आहे की, त्यांनी त्यांच्या घराजवळ अजब प्रकाशही पाहिला आहे.
यूएफओ रिसर्च क्वींसलॅंडचे अध्यक्ष शेरिल गॉट्सचॉल म्हणाले की, कुक दाम्पत्य हे असा दावा करणारं एकटं कुटुंब नाहीये. मेक्सिकोमधील एका गावातील लोकांनी सुद्धा एलिअन्सबाबत असा दावा केला होता. हे गाव अमेरिकेच्या सैन्याच्या छावणीपासून जवळ आहे. इथे राहणाऱ्या लोकांचा दावा आहे की, या बेसवर एलिअन्स येत-जात राहतात. एलिअन्स त्यांच्या गायी उचलून नेतात आणि त्यांचे अवयव कापतात. डोंगराजवळ यूएफओ दिसतात.