'या' बागेतील फुलांचा वास घेताच जातो जीव, 100 पेक्षा जास्त लोकांचा झालाय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 01:09 PM2021-11-25T13:09:23+5:302021-11-25T13:09:29+5:30

या बागेत एकट्याने जाण्यास मनाई आहे, प्रत्येकवेळी गार्डला घेऊनच आत जाता येतं.

The alnwick poison garden, life goes away as you breathe in this garden | 'या' बागेतील फुलांचा वास घेताच जातो जीव, 100 पेक्षा जास्त लोकांचा झालाय मृत्यू

'या' बागेतील फुलांचा वास घेताच जातो जीव, 100 पेक्षा जास्त लोकांचा झालाय मृत्यू

googlenewsNext

जगात अशी अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, जिथे जाताच माणसाचा जीव जातो. काही ठिकाणांची नावे ऐकूनच लोक थरथर कापायला लागतात. इंग्लंडमध्ये अशी एक बाग आहे(Poison Garden Alnwick), जिथून एकटा माणूस कधीही जिवंत परत येत नाही. या बागेत गेल्याने श्वास घेताच माणसाचा जीव जातो.

या बागेचे नाव ऐकूनही लोक घाबरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकांना कधीही बागेत एकटे जाण्याचा सल्ला दिला जात नाही. येथे जाण्यासाठी लोक नेहमी गार्डला सोबत घेतात. पण चुकून कोणी एकटा बागेत गेला तर तो जिवंत परत येऊ शकत नाही. युनायटेड किंगडममधील नॉर्थम्बरलँड येथे असलेल्या या बागेचे नाव 'द अल्नविक पॉयझन गार्डन' आहे. 

'द अल्नविक पॉयझन गार्डन' हे जगातील सर्वात धोकादायक उद्यान मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बाग इंग्लंडमधील सर्वात सुंदर आकर्षणांपैकी एक आहे. मॅनिक्युअर केलेले टोपीअर, रंगीबेरंगी झाडे, सुगंधित गुलाब आणि कॅस्केडिंग कारंजे लोकांना आकर्षित करतात.

100 हून अधिक लोकांचा झालाय मृत्यू 

या बागेत काळ्या रंगाचा लोखंडी दरवाजा बसवला आहे. या दरवाजावर फुलं तोडणेआणि वास घेण्यास मनाई असल्याचे लिहीले आहे. याशिवाय, प्रवेशद्वारावर स्पष्ट इशाराही लिहिला असून धोक्याची चिन्हेही लावण्यात आली आहेत. ही विषारी बाग 14 एकरांवर पसरली आहे. येथे सुमारे 700 विषारी झाडे आहेत. असे म्हणतात की या विषारी फुलांचा उपयोग जुन्या काळात शत्रूंचा पराभव करण्यासाठी केला जात असे. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा या बागेत येऊन मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: The alnwick poison garden, life goes away as you breathe in this garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.