हेलिपॅड, स्विमिंगपूल असलेली अजब गाडी! एकत्र ७० जणांची बसण्याची व्यवस्था; पाहा किती आहे तासाचं भाडं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 03:00 PM2021-11-22T15:00:08+5:302021-11-22T15:00:30+5:30
१९८६ मध्ये एका कारनं जगातील सर्वात लांब गाडी असल्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला होता. कार तयार होण्यास लागली १२ वर्षे.
१९८६ मध्ये एका कारनं जगातील सर्वात लांब गाडी असल्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला होता. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की या कारची लांबी ही १०० फूट इतकी होती. दिसण्यात ही कार एका ट्रेनपेक्षाही कमी वाटत नव्हती. या कारचं नाव अमेरिकन ड्रिम (American Dream) असं होतं. तर पाहूया की या कारची खासियत काय आहे.
ही कार आपल्या लांबीशिवाय यात असलेल्या सुविधांसाठीही प्रसिद्ध आहे. या कारमध्ये एक पर्सनल हेलिपॅड, एक मिनी गोल्फ कोर्स, जकुझी, बाथटब, अनेक टीव्ही, फ्रीज, टेलिफोन आणि स्विमिंगपूलही होता. आजकाल अनेक महागड्या लक्झरी कार्सही येतात. परंतु या कारमद्ये एकावेळी ७० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कारला एकूण २६ व्हिल्स होते आणि दोन्ही बाजूंनी ही कार चालवणं शक्य होतं.
तयार होण्यास १२ वर्षे
अमेरिकन ड्रीम ही कार कोणत्याही कार कंपनीनं नाही तर जे ओहरबर्ग यांनी डिझाईन केली होती. ते हॉलिवूडच्या चित्रपटांमधील मोठ्या परिचायाचे असलेले व्हेईकल डिझायनर होते. ओहरबर्ग यांना कार्सची आवड होती आणि त्यांनी स्वत:साठीही अनेक उत्तम डिझाईनच्या कार्स तयार केल्या होत्या. अमेरिकन ड्रीम ही कार १९८० मध्ये डिझाईन करण्यात आली होती. ही कार तयार होऊन रस्त्यावर उतरण्यात तब्बल १२ वर्षांचा कालावधी लागला.
किती आहे तासाचं भाडं?
या कारचं बॉनेट हेलिपॅडचं काम करतं. तसंच मोठ्या कारसाठी इंजिनही तितकंच शक्तिसाली हवं. यामुळे यात अनेक V8 इंजिन देण्यात आले आहेत. तसंच या कारची लांबी अधिक असल्यानं ही कार मधूनच वळूही शकते. ही कार चित्रपटांमधील दृष्य चित्रित करण्यासाठी तयार करण्यात आली होती. अनेक श्रीमंत लोक ही कार मौजमजेसाठी भाड्यानंही घेत होते. या कारचं भाडं भारतीय रूपयामध्ये जवळपास १४ हजार रूपये इतकं होतं.