तुमच्या जीन्स पॅंटच्या चेनवर असलेल्या YKK चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 02:53 PM2022-08-26T14:53:34+5:302022-08-26T14:55:45+5:30
interesting Facts : तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल. पण कधी मनात विचार आला का की, असं का लिहिलं आहे? नाही ना? चला आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो.
interesting Facts : तुम्ही तुमच्या गल्लीतील टेलरकडून शिवलेली पॅंट असो वा नाइकेची ब्रॅंडेड पॅंट असो दोन्हींच्या चेनवर YKK असं लिहिलेलं असतं. तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल. पण कधी मनात विचार आला का की, असं का लिहिलं आहे? नाही ना? चला आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो.
काय आहे YKK चा अर्थ?
खरंतर YKK चा पूर्ण अर्थ Yoshida Kōgyō Kabushiki gaisha असा आहे. हे एका जपानी कंपनीचं नाव आहे. ही कंपनी जपानच्या टोकीयोमध्ये Tadao Yoshida नावाच्या व्यापाऱ्यांने उभी केली होती. या व्यक्तीने जानेवारी 1934 मध्ये पॅंटची चेन तयार करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली होती.
तसे तर पॅंटच्या चेनचा शोध लावणारा अमेरिकन इंजिनिअर Whitcomb L. Judson याचं नाव अनेकांना माहित नाही. पण जगातील पॅंटची चेन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी YKK करोडों लोकांच्या जीवनाचा भाग बनली आहे. या कंपनीचं नाव 1994 मध्ये बदलून Yoshida Manufacturing Corporation असं करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रॉडक्टवरुन YKK हे नाव कधीच बदलण्यात आलं नाही.
अर्ध्या जगासाठी चेनची निमिर्ती करणारी कंपनी
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, YKK ही चेन तयार करणारी पहिली कंपनी आहे आणि आता या कंपनीचा व्यवसाय भारतासहीत जगातल्या 71 देशांमध्ये पसरला आहे. YKK ही कंपनी जगातल्या अर्ध्या जनतेसाठी चेन तयार करण्याचं काम करते. ही कंपनी भलेही जपानची असेल पण या कंपनीच्या फॅक्टरी युरोप आणि आशियाच्या बॉर्डरवरील मॅकोनमध्ये आहेत. इथे एका दिवसात 50 लाखांपेक्षा जास्त चेन तयार करण्यात येतात.