जबरदस्त! १४ वर्षीय मुलाचे भन्नाट टॅलेंट; Elon Musk यांनी दिली थेट Job ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 06:52 PM2023-06-11T18:52:55+5:302023-06-11T18:53:23+5:30
कैरन काझी आता इलॉन मस्कच्या SpaceX द्वारे जॉबवर घेतलेला सर्वात तरुण मुलगा बनला आहे.
जगात हुशार मुलांची कमतरता नाही, प्रत्येक मुलामध्ये काही ना काही टॅलेंट दडलेले असते. अलीकडेच इलॉन मस्क एका १४ वर्षांच्या मुलाच्या टॅलेंटकडे आकर्षित झाले, या मुलाचे नाव कैरन काझी(Kairan Quazi) आहे. या १४ वर्षांच्या मुलाने स्पेस एक्सची(SpaceX) तांत्रिक आव्हानात्मक मुलाखतीचा टप्पा यशस्वीरित्या पार केला जे भलेभले लोक करू शकत नाहीत.
मुलाखत क्लिअर करून, कैरन काझी आता इलॉन मस्कच्या SpaceX द्वारे जॉबवर घेतलेला सर्वात तरुण मुलगा बनला आहे. स्पेस एक्सने या हुशार मुलाला कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करण्याची जॉब ऑफर दिली आहे. १४ वर्षांच्या मुलाने वयाच्या ११ व्या वर्षी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि या महिन्यात Santa Clara University तून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली.
Kairan Quazi हा मुलगा SpaceX मध्ये काम करण्यास उत्सुक आहे. या मुलाने मंगळावर लोकांना पाठवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनीला मदत करण्यासाठी आपले कौशल्य वापरावे अशी अपेक्षा आहे. लिंक्डइन या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहिताना या मुलाने सांगितले की मी स्टारलिंक इंजिनिअरिंग टीममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सामील होत आहे.
रिपोर्ट्सनुसार, काझी SpaceX वर काम करण्यास त्याच्या आईसोबत प्लेझेंटन, कॅलिफोर्निया येथून रेडमंड, वॉशिंग्टन येथे जाण्याचा विचार करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या १४ वर्षीय मुलाने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे माहिती दिली होती की तो नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करत आहे. या पोस्टच्या काही आठवड्यांनंतर, या मुलाने SpaceX कडून आलेलं जॉब ऑफर लेटर लोकांसोबत शेअर केले.