बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरहून असा दिसतो खालचा अद्भुत नजारा, बघा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:15 PM2024-08-08T12:15:17+5:302024-08-08T12:31:22+5:30

Burj Khalifa video : तुम्हीही अनेकदा या इमारतीचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरून खालचा नजारा कसा दिसतो हे दाखवणार आहोत.

Amazing view of clouds from top floor of burj khalifa video viral | बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरहून असा दिसतो खालचा अद्भुत नजारा, बघा व्हिडीओ!

बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरहून असा दिसतो खालचा अद्भुत नजारा, बघा व्हिडीओ!

Burj Khalifa video : जगातील सगळ्यात उंच इमारत कोणती? असा प्रश्न कुणालाही विचारला तर ते सहजपणे बुर्ज खलिफा हे नाव घेतील. नेहमीच दुबईतील या इमारतीच्या अनेक रोमांचक गोष्टी समोर येत असतात. सोशल मीडियावर तर या इमारतीचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. जगभरातून लोक ही इमारत बघण्यासाठी दुबईला जातात. तुम्हीही अनेकदा या इमारतीचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावरून खालचा नजारा कसा दिसतो हे दाखवणार आहोत.

बुर्ज खलिफा ही इमारत ८२८ मीटर उंच असून यात १६३ मजले आहेत. अशात इतक्या उंच इमारतीवरून खालचा नजारा कसा दिसत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. मोहम्मद आकिब नावाच्या व्यक्तीने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तुम्ही इमारतीवरून खालचा नजारा कसा दिसतो हे बघू शकता.

मोहम्मह आकिबने हा सुंदर नजारा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण यात जे दिसतं ते लोकांनी आधी कधी पाहिलं नसेल. पांढऱ्या ढगांनी झाकलं गेलेलं शहर बघून असं वाटतं जणू ही एक वेगळीच दुनिया आहे.

हा व्हिडीओ बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. ज्यात पांढरे ढग आणि निळं आकाश दिसत आहे. व्हिडिओत तरूण बाल्कनीचा दरवाजा उघडताना दिसतो. नंतर तो कॅमेराने खालचं सुंदर दृश्य दाखवतो. 

या व्हिडिओला आतापर्यंत ३२ लाख वेळ बघण्यात आलं आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. तसेच यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. 

Web Title: Amazing view of clouds from top floor of burj khalifa video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.