जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने बोर्ड मिटिंगमध्ये घातला होता पायजामा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 09:17 AM2018-09-14T09:17:15+5:302018-09-14T09:18:01+5:30

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांनी कंपनीच्या बोर्ड मिटिंगसाठी चक्क पायजामा परिधान केला होता. जेफ बेजोस यांनी स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

amazon ceo jeff bezos wearing pajama in board meeting for help of cancer patients | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने बोर्ड मिटिंगमध्ये घातला होता पायजामा 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने बोर्ड मिटिंगमध्ये घातला होता पायजामा 

Next

नवी दिल्ली : एखाद्या कंपनीच्या बोर्ड मिटिंगसाठी तुम्हाला उपस्थित राहायचे असेल, तर नक्कीच तुम्ही सूट-बूट घालून जाण्यास प्राधान्य द्याल. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉन कंपनीचे सीईओ जेफ बेजोस यांनी कंपनीच्या बोर्ड मिटिंगसाठी चक्क पायजामा परिधान केला होता. जेफ बेजोस यांनी स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

गेल्या बुधवारी अॅमेझॉन कंपनीची बोर्ड मिटिंग झाली. यावेळी मिटिंगमध्ये जेफ बेजोस यांनी निळ्या रंगाचा पायजामा घातला होता. त्यांनी पायजामा घातलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे. जेफ बेजोस यांनी कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पायजामा घातल्याचे सांगितले आहे. 

View this post on Instagram

जेफ बेजोस यांनी इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी अॅमेझॉनच्या बोर्ड मिटिंगमध्ये पायजामा का घातला होता? चाइल्डहुड कर्करोगाविषयी सप्टेंबर महिन्यात जागरूकता वाढविली जाते. दरवर्षी अॅमेझॉन अमेरिकन चाइल्डहुड कॅन्सर ऑर्गनायझेशनसोबत जागरुकता निर्माण करते. अमेरिकेत 4 वर्षात 14 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला. त्याचे कारण म्हणजे चाइल्डहुड कॅन्सर आहे. याचबरोबर, 'गो गोल्ड बॉक्सों'च्या माध्यमातून सुद्धा आम्ही याविषयी जनजागृती करत आहोत.

(अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांचं विमान नागपुरात येताच सिक्युरिटी अॅलर्ट वाजला, अन्...)

Web Title: amazon ceo jeff bezos wearing pajama in board meeting for help of cancer patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.