अचानक थांबला होता चिमुरडीचा श्वासोच्छ्वास, पण पाळलेल्या डॉगीनं केला चमत्कार अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:22 PM2021-12-16T16:22:26+5:302021-12-16T16:23:34+5:30
अनेक दिवसांपासून मुलीची प्रकृती खालावत होती आणि तिला औषध देऊन एका खोलीत झोपवण्यात आले होते.
घरातील पाळीव कुत्रे अनेक वेळा दुसऱ्यांसाठी त्रासदायक ठरतात. मात्र, अनेकदा असेही दिसून आले आहे, की पाळीव कुत्रे कधी-कधी असा काही पराक्रम करतात, की त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच ठरते. नुकतेच एका महिलेसोबतही एक अशीच घटना घडली आहे. तिच्या कुत्र्याने चक्क तिच्या चिमुरडीचा जीव वाचवला आहे. तेही, जेव्हा या चिमुरडीचा श्वास थांबला होता. यानंतर जे घडले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते.
ही घटना दक्षिण अमेरिकेतील असून अँड्र्यू नावाच्या महिलेने तिच्या ट्विटरवर शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून मुलीची प्रकृती खालावत होती आणि तिला औषध देऊन एका खोलीत झोपवण्यात आले होते. दरम्यान, या महिलेचे लक्ष तिच्या पाळीव कुत्र्यावर गेले. हा कुत्रा अचानकच मुलीच्या खोलीत जाऊन तिला तिला उठविण्याचा प्रयत्न करत होता.
हा प्रकार पाहून महिलेला राग आला आणि तिने कुत्र्याला खोलीतून बाहेर काढले. मात्र काही वेळाने तो पुन्हा मुलीजवळ पोहोचला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. यानंतर महिलेने कुत्र्याला पुन्हा बाहेर काढले आणि ती मुलीजवळ गेली. तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचा श्वासोच्छ्वास थांबलेला आहे आणि तो बेशुद्धावस्थेत आहे. यानंतर ती आणि तिच्या पतीने चिमुकलीला तत्काळ रुग्णालयात नेले.
Last night the dog kept breaking into the nursery and waking the baby. She’s been sick, and I was getting so fed up with him.
— kelly andrew 🍂 (@KayAyDrew) December 14, 2021
Until she stopped breathing.
We spent the night in the hospital. I don’t know what would have happened if he hadn’t woken her. We don’t deserve dogs. pic.twitter.com/PBJCJVflgh
...परंतु सत्य काही वेगळे होते -
रुग्णालयात उपचार केल्यानंतर चिमुकलीची प्रकृती स्थिर आहे. संबंधित महिलेने सांगितले की, तिच्या कुत्र्यामुळे तिचे मूल वाचले आणि तिचा त्याच्याबद्दल गैरसमज झाला होता. महिलेने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, तिचा कुत्रा सतत तिच्या आजारी मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला, तिला वाटले की त्यांचा कुत्रा त्यांच्या आजारी मुलाला त्रास देत आहे, परंतु सत्य वेगळे होते.