65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 08:20 PM2023-09-18T20:20:34+5:302023-09-18T20:22:17+5:30

5 फेब्रुवारी 1958 रोजी अमेरिकेचा 3447 किलोचा अणुबॉम्ब बेपत्ता झाला, 2004 मध्ये शोध सुरू केला.

america-missing-nuclear-bomb-found-off-the-us-coast-of-georgia | 65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना...

65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना...

googlenewsNext

अमेरिकन हवाई दलाची विमाने अमेरिकेतील विविध शहरांवरुन उड्डाण करत असत. घटनेच्या दिवशी पायलट हॉवर्ड रिचर्डसन बी-47 बॉम्बर विमान उडवत होते. यादरम्यान, त्यांच्या विमानाची फायटर जेट F-86 विमानाशी टक्कर झाली. अणुबॉम्बच्या वजनामुळे विमान लँड करणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी अमुबॉम्ब समुद्रात टाकून सुरक्षित लँडिंग केली.

या घटनेनंतर कुणालाही स्फोटाचा आवाज ऐकू आला नाही, त्यामुळे अमेरिकन नौदलाने त्या बॉम्बचा शोध सुरू केला. दोन महिने उलटूनही तो बॉम्ब सापडला नाही. 16 एप्रिल 1958 रोजी अमेरिकन लष्कराने हा बॉम्ब बेपत्ता झाल्याची घोषणा केली. हवाई दलाने सांगितले की, बॉम्ब पूर्णपणे तयार नव्हता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्फोट किंवा रिडिओअॅक्टिव्हिटी होण्याची शक्यता नाही.

त्या घटनेनंतर थेट 2000 साली या बॉम्बला शोधण्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. माजी हवाई दल अधिकारी डेरेक ड्यूक यांनी जॉर्जियाचे खासदार जॅक किंग्स्टन यांच्याशी संपर्क साधला. किंग्स्टन म्हणाले की, हवाई दलाला बॉम्ब शोधायचा असेल तर ते शोधू शकतात, मात्र त्यासाठी 50 लाख डॉलर खर्च येईल. तो बॉम्ब सापडेल, याचीही खात्री नाही. स्पर्श करताच बॉम्ब फुटू शकतो किंवा त्यातील रेडिएशन बाहेर येऊ शकते. 

असे काहीही होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. विशेष म्हणजे, 7600 पौंड (3447 KG) वजनाच्या बॉम्बमध्ये 400 पाउंड (181 KG) घातक पदार्थ होता. पण, डेरेक ड्यूक यांनी ऐकले नाही आणि 2004 मध्ये त्यांनी या बॉम्बचा शोध सुरू केला. त्यांच्या उपकरणांना टायबी बेटाजवळील समुद्रात रेडिओअॅक्टिव्हिटी आढळली. मात्र हवाई दलाच्या तपासणीत हे नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या खनिजांमधून येत असल्याचे समोर आले. 

एका दशकानंतर, 2015 मध्ये आणखी एका नागरिकाने विचित्र रिडिंग्स पाहिल्या. न्यूक्लियर इमर्जन्सी सपोर्ट टीमने ऑपरेशन स्लीपिंग डॉग सुरू केले. लष्करी पाणबुडे पुन्हा समुद्रात उतरले, पण त्यांना 12 फूट लांब बॉम्ब सापडला नाही. अमेरिकेचे ऊर्जा खाते काही शांत बसले नाही, त्यांनी तज्ञ पाठवले. नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनच्या उपसंचालक शैला हसन या तपासासाठी गेल्या होत्या. पण, त्यांनाही तो अणुबॉम्ब काही सापडला नाही. त्या बॉम्बचे काय झाले, हे रहस्य आजपर्यंत उलगडले नाही.

निवृत्त हवाई दल अधिकारी स्टीफन श्वार्ट्झ यांनी या अणुबॉम्बच्या घटनेवर आपल्या पुस्तकात लिहिले आहे. 'अटॉमिक ऑडिट: द कॉस्ट अँड कन्सेक्वेन्सेस ऑफ यूएस न्यूक्लियर वेपन्स सिन्स 1940' असे या पुस्तकाचे शीर्षक आहे.

Web Title: america-missing-nuclear-bomb-found-off-the-us-coast-of-georgia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.