ऐकावं ते नवलंच! महिलेने ऑनलाइन मागवला सेकंड हँड सोफा, त्यात सापडले 28 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:17 PM2022-06-07T15:17:22+5:302022-06-07T15:17:47+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका महिलेला जुन्या सोफ्यात 28 लाख रुपये सापडले.
Viral News: जुन्या वस्तुंमध्ये एखादी मौल्यवान गोष्ट सापडल्याच्या घटना तुन्ही अनेकदा ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या महिलेसोबत घडली. महिलेने सेकंड हँड सोफा ऑनलाइन ऑर्डर केला. घरी पोहोचल्यानंतर सामानाची तपासणी करत असताना त्यात सुमारे 28 लाख रुपये मिळाले.
कुशनमध्ये सापडले पैसे
मिळालेल्या माहितीनुसार, विकी उमोडू नावाची महिला तिच्या नवीन घरासाठी ऑनलाइन फर्निचर शोधत होती. एका वेबसाइटवर तिला दोन सोफे आणि एक खुर्ची दिसली. वेबसाइटवर सोफा विनामूल्य उपलब्ध होता. तिने तो सोफा ऑर्डर केला. सोफा घरी आल्यानंतर ती सामानाची तपासणी करत असताना तिला सोफ्याच्या कुशनमध्ये काहीतरी लपवल्याचे दिसले.
महिलेने पैसे परत केले
सुरुवातीला महिलेला वाटले की, हे हीट पॅड आहे. नंतर तिने कुशन उघडून पाहिले असता, तिला धक्का बसला. कारण, त्यात एका लिफाफ्यात तिला सुमारे 28 लाख रुपये सापडले. पैसे मिळाल्यानंतर महिलेने ताबडतोब त्या कुटुंबाला फोन केला आणि ते पैसे परत केले. प्रामाणीकपणा दाखवल्याबद्दल फर्निचर देणाऱ्या कुटुंबाने त्या महिलेला 2 लाख रुपये बक्षीस दिले.