पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 05:21 PM2023-08-09T17:21:43+5:302023-08-09T17:22:01+5:30
ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे.
हिंदीत एक म्हण आहे, ‘भगवान जब भी देता है तो छप्पर फाड़कर देता है.’ म्हणजेच, देव देतो तेव्हा खूप काही देतो. अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे. गेल्या मंगळवारी फ्लोरिडातील एका व्यक्तीने लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यात त्याने 1.58 बिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 13,082 कोटी रुपये जिंकले.
लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही, पण ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी लॉटरी असल्याचे सांगितले जात आहे. लॉटरी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पॉवरबॉल गेममध्ये विनिंग नंबर्स 13, 19, 20, 32, 33 होते. या व्यक्तीच्या तिकीटावर तेच नंबर होते. आता विजेत्याकडे एकाचवेळी 757.2 मिलियन डॉलर (6,269 कोटी रुपये) घेण्याचा किंवा 30 वर्षांमध्ये पूर्ण 13,082 कोटी रुपये घेण्याचा पर्याय आहे.
30 कोटींमध्ये 1 लकी विनर
मेगा मिलियन्स तिकिटाची किंमत फक्त दोन डॉलर आहे. ही लॉटरी तिकीट अलबामा, ऊटा, अलास्का, हवाई आणि नेवाडासोडून, इतर सर्व राज्यांमध्ये विकले जातात. जिंकण्याची शक्यता फार कमी असते. असे म्हणतात की, 30 कोटींपैकी फक्त 1 व्यक्तीच ही लॉटरी जिंकू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये कुणीच हा मेगा जॅकपॉट जिंकू शकला नाही.